PM SVANidhi Scheme esakal
नाशिक

Nashik : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिकेत (MMC) केंद्र शासन (Central Government) पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची (Pradhan Mantri street vendor Atmanirbhar Nidhi Scheme) अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेत पथविक्रेत्यांना १० हजार रुपये एका वर्षासाठी बँकेमार्फत विनातारण कर्ज (Unsecured loan), नियमित कर्ज (Regular loan) परतफेड केल्यास ७ टक्के व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहार केल्यास कॅश बॅक (Cash Back) मिळणार आहे. पथ विक्रेत्यांनी मुदतीत कर्ज फेड केल्यास बँकेकडून दुसऱ्यांदा २० हजारांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. (Pradhan Mantri street vendor Atmanirbhar Nidhi Scheme Nashik News psl98)

महानगरपालिकेला शहरातील ५ हजार ६६६ पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावयाचा आहे. पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी www.pmsvanidhi.mouha.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. मनपा पीएम स्वनिधी कक्षातर्फे अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जासाठी अर्ज करावेत. मनपाच्या कार्यक्षेत्रातील ग्राहक सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन कर्जाचे फॉर्म भरण्यात येत आहे‌. त्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात अर्ज करावेत. आजवर ६ हजार १०९ पथविक्रेत्यांनी कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.

यापैकी ४ हजार २३९ पथविक्रेत्यांना बँकांकडून कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. मनपाच्या शिफारस पत्रासाठी ८ हजार ९६७ पथविक्रेत्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे‌. त्यापैकी ८ हजार ९१२ पथविक्रेत्यांना मनपाने ऑनलाईन शिफारस पत्र दिले आहे. ज्या पथविक्रेत्यांनी अजून कर्जासाठी अर्ज भरलेले नाही त्यांनी तात्काळ अर्ज भरावेत. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेतले असून कर्जाची परतफेड केली आहे अशांनी २० हजार रुपये कर्जासाठी अर्ज करावेत. जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Nashik Municipal Election : दिवे कुटुंबाची 'सहावी' इनिंग; काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले 'धनुष्यबाण' आणि 'कमळ'!

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT