फोटो-27353
येवला : प्रगतिक विचार व्याख्यानमालेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी पदाधिकारी.
प्रागतिक विचार व्याख्यानमालेच्या
अध्यक्षपदी प्रा. अजय विभांडिक
येवल्यात २६ नोव्हेंबरमध्ये व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. २८ : येथील समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. अजय विभांडिक यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. एस. के. पाटील आणि प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांची बिनविरोध निवड झाली. कार्याध्यक्षपदी ॲड. दिलीप कुलकर्णी यांची निवड झाली.
व्याख्यानमालेच्या आगामी २७ व्या वर्षाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
व्याख्यानमालेचे मावळते अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे अध्यक्षस्थानी होते. सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. व्याख्यानमालेचे यंदा २७ वे वर्ष आहे. व्यापक वैचारिक प्रबोधनाच्या उद्देशाने २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत व्याख्यानमाला होणार आहे.
व्याख्यानमालेच्या कोशाध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय चव्हाण, रामनाथ पाटील, सचिवपदी दिनकर दाणे, सहसचिवपदी पुरुषोत्तम पाटील, संघटकपदी प्रा. डॉ. मनोहर पाचोरे, संयोजकपदी ॲड. समीर देशमुख, तर सहसंयोजकपदी नारायण डोखे यांची निवड झाली. संचालकपदी डॉ. स्वाती धनगर, डॉ. किशोर पहिलवान, राजेश भांडगे, अजिज शेख, नामदेव दाभाडे, डॉ. सुरेश कांबळे, प्रा. डॉ. बाळासाहेब राहणे, अजहर शहा, डॉ. सतीश कुर्हे, बाजीराव सोनवणे, प्रा. शीतल शिंदे, प्रा. संतोष मढवई, शैला कलंत्री, सुधा पाटील, देवयानी गमे, बाबासाहेब शिंदे, प्रमोद पाटील, मिलिंद गुंजाळ, ॲड. साजिद शेख यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.
यंदाही नामवंत वक्त्यांनी व्याख्यानमालेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले. नवनाथ शिंदे यांनी आभार मानले.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.