नाशिक

प्रकाश लोंढे ‘कारागृहा’बाहेर

CD
प्रकाश लोंढे ‘कारागृहा’बाहेर सुटका होताच अज्ञातस्थळी रवाना : दर सोमवारी हजेरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : राजकीय वैमनस्यातून सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मोठा दिलासा देत संशयित प्रकाश मोगल लोंढे याचा जामीन अर्ज मंजूर केल्याने गुरुवारी (ता.१५) लोंढे कारागृहाबाहेर आले. परंतु सातपूर येथे न येता अज्ञातस्थळी रवाना झाले. दरम्यान, न्या. मिलिंद जाधव यांच्या आदेशानुसार, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सातपूर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. सातपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०९, ३०८(२)(४), ३२४(४)(५), ३५१(२)(३), १९०, ६१(२), १८९(२)(४), तसेच क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट, आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रकाश मोगल लोंढे यांना २५ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीनासाठी लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, त्यावर दोन दिवसांपूर्वी एकल खंडपीठाचे न्या. मिलिंद जाधव यांनी सशर्त जामीन मंजूर केला. आदेशाची प्रत नाशिक रोड मध्यवर्ती कारगृहाला मिळताच, गुरुवारी (ता. १५) दुपारी लोंढे कारागृहाबाहेर आले. परंतु सातपूरमधील निवासस्थानी न येता ते अज्ञातस्थळी गेल्याचे समजते. ​ जामिनाच्या अटी व शर्ती अशा -​ २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका -​खटला सुरू होईपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सातपूर पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी - ​खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्येक तारखेला न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागेल - पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT