औरा बार गोळीबार प्रकरण
---------
प्रकाश लोढेंला जामीन;
पण मुक्काम कारागृहातच
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार, खंडणी व अपहरणप्रकरणी गेल्या वर्षभरापासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेला माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यास मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, गोळीबारासह खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावण्यात आला असल्याने लोंढेचा कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे.
औरा बारमधील गोळीबार, खंडणी आणि अपहरणाचा प्रकार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे घडला होता. यात भूषण लोंढे व त्याच्या टोळीने एकावर गोळी झाडली होती. यात वरुण तिवारी हा युवक जखमी झाला होता. तर बार चालकांकडून भूषण लोंढे याने खंडणी उकळली होती. याप्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्यासह भूषण व दीपक लोंढे यांच्यासह पीएल ग्रुपच्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर लोंढेच्या पीएल ग्रुपविरोधात खंडणीसह प्राणघातक हल्ला, धमकी, आर्थिक फसवणूकीचे शहर आयुक्तालयातील अंबड, सातपूर पोलिसात सुमारे आठ ते नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोंढे टोळीविरोधात संघटीत गुन्हेगारी अंतर्गत मकोका लावला आहे.
दरम्यान, लोंढे याने जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असता, त्याचा फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोळीबार व खंडणीच्या गुन्ह्यात प्रकाश लोंढे यास मंगळवारी (ता. १३) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
------------
मात्र सुटका नाही
प्रकाश लोंढे यास उच्च न्यायालयाने खंडणी व गोळीबाराच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. परंतु लोंढे याच्याविरोधात इतर आठ ते नऊ गुन्ह्यांसह मकोकाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी त्याची कारागृहात सुटका होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.