NSK26H34436
नाशिक : भद्रकालीतील प्रणिता इंडिक फूड्स येथील अन्न पदार्थांची अस्वच्छता.
------------
३०-२
भद्रकालीतील ''प्रणिता फूड्स''चा
परवाना निलंबित, अन्नसाठा जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करीत भद्रकालीतील साक्षी गणपती येथील ''मे. प्रणिता इंडिक फूड्स प्रा. लि.'' या आस्थापनेवर छापा टाकत संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. करण मनघनानी यांच्या मालकीच्या ''मे. प्रणिता इंडिक फूड्स प्रा. लि.'' या आस्थापनेमध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे तपासणीदरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच तेथे तयार करण्यात आलेला अन्नपदार्थांचा साठा अप्रमाणित असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्तीची कारवाई केली.
या कारवाईदरम्यान प्रशासनाने ३२ हजार ८८० रुपयांची मिसळ शेव (१३७ कि.ग्रॅ.), ११ हजार ३२० रुपयांचा नाशिक चिवडा (४३ कि.ग्रॅ.) असा एकूण ४३ हजार २०० रुपयांचा १८० किलो अन्न साठा जप्त केला आहे. आस्थापनेतील अस्वच्छता आणि अन्नसाठ्याबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे या दुकानाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेचे निकष पाळणे प्रत्येक अन्न व्यावसायिकासाठी बंधनकारक आहे. ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी प्रशासनाची ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.