नाशिक

‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’साठी नावनोंदणी प्रक्रियेस प्रारंभ

CD
(बातमी आवश्‍यक) NSK26H34432 जळगाव : एसएसबीटी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरू करताना संस्थेचे संचालक रावसाहेब शेखावत. सोबत महाविद्यालयीन अधिकारी. ----- ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’साठी नावनोंदणी प्रक्रियेस प्रारंभ उपशीर्षक २० डिसेंबरला जळगावात आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : एसएसबीटी संस्थेतर्फे येत्या २० डिसेंबरला आयोजित ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या उपस्थितीत नोंदणी प्रक्रियेस सुरवात करण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या १९ डिसेंबरला असलेल्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली. या वेळी स्पर्धेचे समन्वयक डॉ. एम.व्ही. रावलानी व डॉ. प्रदीप एम सोलंकी, तसेच रेस डायरेक्टर प्रा. प्रवीण पाटील व डॉ. दिनेश पुरी आदी उपस्थित होते. प्रथम ५ किलोमीटर गटात नाव नोंदवून श्री. शेखावत यांनी यावर्षीची ही स्पर्धा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करणारी असून स्पर्धेची संकल्पना ‘जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ अशी असल्याचे सांगितले. स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस म्हणून देण्यात येईल. ही स्पर्धा जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेचा मार्ग जळगाव शहरातून असणार आहे. स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Latest Marathi News Live Update: जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही -मंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT