pratiksha bankar from a rural area became a social media star nashik marathi news 
नाशिक

घरबसल्या अमेरिकेतून पैशांची कमाई; सात बंगल्यातील सून सोशल मीडियाची ‘स्टार’, पाहा VIDEO

प्रशांत कोतकर

नाशिक : कोण म्हणतं... तुम्हाला हेच हवं-तेच हवं... इथे तुम्ही जा, हे शिका अन्‌ करिअर करा... हे सगळं सांगण्याच्या बाबी... ‘इच्छा असेल तर मार्ग’ अन्‌ तुमच्यात असलेल्या कौशल्याचा योग्य मार्गाने वापर केल्यास तुम्ही निश्‍चित यशाचे मानकरी नव्हे तर तुम्ही एका उंचीवर जाऊन पोचू शकतात... हे दाखवून दिले आहे ते खडकओझर (ता. चांदवड) या खेड्यातील युवती प्रतीक्षा बनकरने सोशल मीडियावर आपल्या अदाकारीतून जगभरातील चाहत्यांकडून मिळविलेल्या पसंतीतून... 

प्रतीक्षा बनकर ही नाशिक ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक रतन बी. पगार यांची कन्या अन्‌ नाशिकमधील काठे गल्लीतील सात बंगल्याचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते यादवराव बनकर यांची सून. वाणिज्य शाखेतील पदवीप्राप्त प्रतीक्षाचे प्राथमिक व माध्यमिक सातवीपर्यंत शिक्षण गावीच झाले. त्यानंतरचे शिक्षण नाशिकमधील रुंग्ठा व पदवीचे शिक्षण केटीएचएममध्ये झाले. पदवीचे शिक्षण घेत असताना दुसऱ्या वर्षातच गॅदरिंग व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या अदाकारीला वाव मिळाला. आपल्यातील कलेला आपण न्याय द्यावा, असा ठाम निर्णय घेतला. यात साथ मिळाली ती विशाल बनकर या मित्राची... या त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर आयुष्यभराच्या मैत्रीत झाले.

नामवंताकडू कौतुक

पदवीनंतर प्रतीक्षा पगार ही प्रतीक्षा बनकर झाली. सात बंगल्याचा विस्तार व प्रतिष्ठित व ६० जणांच्या एकत्रित कुटुंबात प्रतीक्षाचा वावर सुरू झाला. विवाहानंतर काही कालावधी गेल्यानंतर ‘विराट’च्या रूपाने दोनाचे चार व चाराचे सहा हात झाले. मात्र, या कालावधीत प्रतीक्षातील कला तिला अस्वस्थ करीत होती. २०१८ मध्ये बाळ दोन महिन्यांचे असताना मोबाईलवर स्वत:चा व्हिडिओ तयार केला अन्‌ तो शेअर केला. व्हिडिओ शेअर केल्यानंतर सहा दिवसांनंतर तो पॉप्युलर झाल्याचे लक्षात आले. मग आठवड्यातून एक असा व्हिडिओ शेअर करायला सुरवात केली. यास साथ मिळाली ती विशालची... विशाल यांचाही सहभाग मिळाला... मराठमोळ्या दिसण्याला आणि पेहरावला जगभरातील चाहते पसंती देत असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे प्रतीक्षाने जास्त लक्ष केंद्रित केले. म्हणतात अवघ्या काही दिवसांतच टिक टॉकची स्टार बनली. टिक टॉक बंद पडले... मात्र, प्रतीक्षाची अदाकरी इन्स्टाग्राम व यूट्यूबच्या माध्यमातून झळकत होती. हजारो लोकांनी त्यास पसंती दिली व देत आहेत. विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तिशः कौतुकदेखील केले आहे. 

घराच्या चार भिंतींत मिळवलं यश

प्रतीक्षा सांगते, मी काही जगावेगळे केलेले नाही... जे काही केले आहे ते हातात असलेल्या वस्तूंमधून आणि तेही घरी बसून. आज मी घरी बसून फक्त मनोरंजन, माझ्यात असलेले कलागुण माझ्या माता-भगिनींना समजतील अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. यातून मला आज अमेरिकेतून काही ठराविक रक्कम मानधन म्हणून मिळत आहे. यातून मी एकच संदेश दिला की मीही तुमच्यासारखी गृहिणी चार भिंतींत असणारी पण घरी बसूनही पैसे कमवू शकते तीही अमेरिकेतून... आज माझ्या काही व्हिडिओंना पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

सोशल मीडिया स्टार... 
टिकटॉक बॅन चॅनल : २ मिलियन 
इन्स्टाग्राम : १ लाख २ हजार 
यूट्यूब : ६९ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT