ramdan eid 2021 esakal
नाशिक

मालेगावात रमजान ईदनिमित्त घरीच नमाजपठण; शुक्रवार-जुम्मा व ईद समीकरणाने आनंद!

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : राज्यात औरंगाबादसह विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याने तसेच ३० रोजे पूर्ण झाल्याने शुक्रवारी (ता.१४) रमजान ईद (Ramadan 2021) साजरी होणार आहे. शुक्रवार-जुम्मा व ईद असे समीकरण जुळून आल्याने रमजान ईदचा आनंद द्विगुणित झाला. कोरोना संसर्ग व कठोर लॉकडाउन असतानाही शहरात बुधवार व गुरुवारी रात्री चाँदरातच्या खरेदीसाठी तोबा गर्दी (crowd) उसळली होती. वाढत्या गर्दीमुळे (crowd) प्रशासनही हतबल झाले होते. शासनाने सामूहिक नमाजपठणास बंदी केली असून, मालेगाववासीयांनी घरातच नमाजपठण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Pray at home today on occasion of Ramadan)

सामाजिक अंतर पाळून नमाजपठण

रमजान ईदनिमित्त महापालिकेने गुरुवारी (ता. १३) शहरात स्वच्छता मोहीम राबविली. प्रार्थनास्थळे व परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता, पाणीपुरवठा यासंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. कामगारांनी अंतिम टप्प्यातील खरेदीसाठी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने शिरखुर्म्याचे साहित्य, सुकामेवा, रुमाल, ओढणी, लुंगी, तयार कपडे, टोपी, अत्तर यांसह विविध वस्तूंची विक्रमी विक्री झाली. सणामुळे उद्यापासून यंत्रमागाचा खडखडाट किमान तीन दिवस बंद राहणार आहे. मुख्य नमाजपठणाला बंदी असल्याने पोलिसांनी ईदगाह मैदनाच्या चहूबाजूला बॅरिकेडिंग करून तपासणी सुरू केली आहे. सामूहिक नमाजपठण होणाऱ्या दहापेक्षा अधिक मैदानांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नमाजपठणास पोलिसांतर्फे मज्जाव करण्यात येणार आहे. बंदी असली तरी शहरातील मोजक्या प्रार्थनास्थळांमध्ये मात्र सामाजिक अंतर पाळून नमाजपठण होण्याची शक्यता आहे. प्रार्थनास्थळातील नमाजपठणास अटकाव करणे शक्य नसले तरी मैदानांवरील सामूहिक नमाजपठण होऊ नये, यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी शहरातून सशस्त्र संचलन केले. आज सर्व प्रमुख चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Raigad News: रिल्सच्या नादात जीव गमावला, धबधब्यात पाय घसरून खोल दरीत कोसळला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, Video Viral

Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

SCROLL FOR NEXT