Dr. Purushottam Rajimwale esakal
नाशिक

Agnihotra Program Nashik : सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात : डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले

अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पाच मिनिटे केले जाते. उद्याचा सूर्यास्त ६ वाजून ३ मिनिटांनी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Agnihotra Program Nashik : मंगळवारी (ता. २) अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी, अष्टविनायक मित्रमंडळ आणि माऊली संस्थेतर्फे सायंकाळी सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात होणाऱ्या सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आयोजक देवानंद बिरारी यांनी दिली आहे.

अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पाच मिनिटे केले जाते. उद्याचा सूर्यास्त ६ वाजून ३ मिनिटांनी आहे. (Preparation for collective Agnihotra program are in final stages nashik news)

याच वेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे अग्निहोत्र उपस्थितांकडून करून घेणार आहेत. यासाठी अक्कलकोट येथून ५०० अग्निहोत्र पात्र मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पोचणार आहेत. भाविकांची संख्या वाढली तर एका पात्रात दोघांची किंवा त्यापेक्षा जास्त जणांची व्यवस्था करण्यात येईल. इतर उपस्थित शेकडो भाविक नेमके हे अग्निहोत्र काय आहे, ते कसे आणि का करावे याबाबतचे मार्गदर्शन डॉ. राजीमवाले यांच्या संबोधनातून घेतील.

पिरॅमिड सारखा आकार असलेल्या तांब्याच्या (अथवा मातीच्या) पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत, समंत्रक गायीचे तूप माखलेल्या दोन, दोन चिमटी अखंड तांदळाच्या आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र कोणतीही व्यक्ती करू शकते. जातपात, धर्म, भाषा, देश, स्त्री-पुरुष या भेदांपलीकडील ही उपासना आहे.

अग्निहोत्र अत्यंत कमी वेळात म्हणजे ५ मिनिटात संपन्न होतो. खर्चही फारच कमी येतो. अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्धी, मनःशांती व स्वास्थ, विचारांची स्पष्टता व विकारांचा समतोल रोगजंतूंचे निरोधन यासोबत उर्वरित अग्निहोत्र भस्म हे उत्तम औषध व प्रभावी खत म्हणून अनुभवास आले असल्याचे मानले जाते.

भव्य व्यासपीठ

साडेचार वाजता कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. श्रीराम मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त स्वप्नील शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदी उपस्थित राहणार आहेत. अग्निहोत्र विषयावर पीएच. डी. केलेले डॉ. योगेश वारे आणि उपनिषदावर प्रावीण्य असलेले आमोद विसेकर मार्गदर्शन करणार आहेत.

सातपूर भागात चाळीस वर्षांपूर्वी अग्नी मंदिर बांधलेले अरविंद पतंगे हे विशेष अतिथी असतील. कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभारले जात असून, सुरक्षाविषयक आणि इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. सुनील वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, नंदू आमले, पुरुषोत्तम पाटील, मनीष मोरे, रोहन नहिरे, सुधीर महाले, अविनाश गीत, अरुण मुनशेट्टीवार, कुणाल पाटील, बळिराम जाधव, सार्थक महाजन, बन्सल पटेल, दुर्गेश विसपुते, साहिल सोनावाला आदी संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT