Ajit Pawar  esakal
नाशिक

Nashik News : अजितदादांच्या उपस्थितीत गुरुवारी शहा येथे शेतकरी मेळावा

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या गुरुवारी सिन्नर तालुका दौऱ्यावर येत आहेत. नामदार पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता शहा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सिन्नरच्या पूर्व भागातील जनतेसाठी आश्वासक असलेल्या 132 केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्राच्या लोकार्पणाचे निमित्त साधून हा शेतकरी मेळावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी आयोजित केला आहे. (presence of Ajit pawar farmers will meet at Shah on Thursday Nashik News)

अजित दादा पवार यांच्या सोबतच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार धनंजय मुंडे, आमदार दिलीप बनकर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हयातील बडे नेते शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या गेलेल्या सिन्नर तालुक्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडूनही शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

सिन्नरच्या पूर्वभागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून शहा येथील 132 केव्हीए क्षमतेचे विज केंद्र मार्गी लागले आहे. जानेवारीत हे वीज केंद्र बाबळेश्वर येथून पावर ग्रीड च्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आले असून वडांगळी, सोमठाणे व देवपूर या उपकेंद्रांना विज पूरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

या विजय केंद्रातून वावी व पाथरे या सिन्नर तालुक्यातील उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन असून शेजारच्या कोपरगाव तालुक्यातील चार उपकेंद्रांना देखील वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अपुऱ्या दाबाने होणाऱ्या विजापूरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

या वीज केंद्राच्या लोकार्पणाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार शहा येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील. सिन्नर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी या मेळाव्याच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT