नाशिक

राष्ट्रपतींना ध्वजारोहणाचे निमंत्रणच नाही

CD
राष्ट्रपतींना ध्वजारोहणाचे निमंत्रणच नाही सिंहस्थाचा शंखनाद : प्रशासनातर्फे चर्चेचे गुऱ्हाळ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला अवघे १८ दिवस उरले असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अद्याप अधिकृत निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. कुंभमेळा प्राधिकरणानेच याबाबत कबुली दिली आहे. दुसरीकडे, ध्वजारोहणाच्या प्रमुख ठिकाणांसह रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्ते खोदले गेले असून, सोहळ्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ३१ तारखेला शंखनादाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. मात्र, राष्ट्रपतींचे निमंत्रण आणि त्यांच्या उपस्थितीबाबत अद्याप स्पष्टता नाही. राष्ट्रपती भवनाशी चर्चा सुरू असल्याचे सांगून प्राधिकरणाकडून ठोस माहिती देणे टाळले जात आहे. नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ परिसरातील कामे ध्वजारोहणापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, कामांचा वेग पाहता निर्धारित वेळेत ती पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. राष्ट्रपतींनी उपस्थिती दर्शविल्यास त्यांना नाशिक की त्र्यंबकेश्वर, यापैकी कुठे नेणार, हा प्रश्नही प्रशासनासमोर आहे. त्यातच दोन्ही ठिकाणांकडे जाणारे रस्ते खोदलेले असल्याने राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या वाहतुकीचे आव्हान वाढले आहे. परिसर झाकण्यासाठी हिरव्या कापडाचा आधार राष्ट्रपतींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा प्रोटोकॉलची तयारी करत आहे. मात्र, रामकुंड किंवा कुशावर्त परिसरातील सुरू असलेल्या कामांचे विद्रूप चित्र राष्ट्रपतींच्या नजरेस पडू नये, यासाठी परिसर हिरव्या कापडाने झाकण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. विकासकामे वेळेत पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता असताना परिसर झाकण्याच्या उपाययोजनेची चर्चा सुरू झाली आहे. ‘मुख्यमंत्री योगी आमचे गौरवस्थान’ राष्ट्रपतींना निमंत्रित करताना सकाळी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात त्यांचा सहभाग असावा आणि सायंकाळी नाशिकमध्ये त्यांच्या हस्ते होणाऱ्या गोदावरी महाआरतीला त्र्यंबकेश्वरमधील सर्व आखाड्यांनी उपस्थित राहावे, अशी भूमिका अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोशाध्यक्ष तथा आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी मांडली. त्यामुळे दोन्ही प्रमुख सोहळ्यांना उपस्थित राहता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच ध्वजारोहण सोहळ्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही निमंत्रित करावे. ते साधु-महंतांचे गौरवस्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली. कोट राष्ट्रपतींच्या उपस्थितीबाबत सविस्तर माहिती नंतर देऊ. त्यांना कोणत्या मार्गाने आणले जाणार, याबाबतही वेळोवेळी स्पष्टता दिली जाईल. -शेखर सिंह, आयुक्त, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT