नाशिक

अखिल विश्‍वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी

CD
मेन फोटो : H34099, H34101, H34102, H34100 -- विपुल पर्जन्यासह सुख, समाधान, समृद्धी नांदावी राष्ट्रपतींकडून गोदावरी चरणी प्रार्थना; पंचोपचार, यज्ञपूजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : जगामधील युद्ध थांबावे अन्‌ अखिल विश्‍वामध्ये शांती प्रस्थापित होवो. जगभरात विपुल पर्जन्यासह सुख, समाधान व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दक्षिण वाहिनी गंगा गोदावरी मातेच्या चरणी केली. या वेळी गोदावरी नदीची त्यांनी मनोभावे आरती केली. नाशिक- त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वास शनिवारी (ता. ३१) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. गोदाघाटावरील रामतीर्थ येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा झाला. या वेळी वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत, केंद्र व राज्यामंत्री, लोकप्रतिनिधी तसेच नाशिककरांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या सोहळ्याने वातावरण भारावून गेले. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते पंचोपचार पूजन आणि यज्ञपूजन संपन्न झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे रामतीर्थ येथे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी पंचोपचार पूजन व यज्ञपूजन केले. याप्रसंगी दही, पंचामृत, हळद-कुंकू व पुष्पांच्या साहाय्याने पंचोपचार पूजन आणि जगाच्या कल्याणासाठी संकल्प केले. तसेच यज्ञामध्ये पूर्णाहुती अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी गंगापूजन करून गंगा-गोदावरी मंदिरात षोडशपचार पूजन केले. मंदिरानंतर मुख्य ध्वजदंडाचे राष्ट्रपतींच्या पूजन करण्यात आले. ठीक दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ ध्वजा फडकविण्यात आली. यावेळी उपस्थितांनी सीयांवर रामचंद्र की जय, गंगा गोदावरी माता की जयचा घोष केला. मुख्य ध्वजारोहणानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते गोदावरी नदीची महाआरती संपन्न झाली. ---चौकट यांनी केले पौराहित्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गंगा- गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पौरोहित्याची जबाबदारी पार पाडली. सिंहस्थ उत्सव समिती अध्यक्ष सतीश शुक्ल आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, सरचिटणीस प्रतीक शुक्ल, कार्याध्यक्ष शेखर शुक्ल, वैभव दीक्षित, भालचंद्र शास्त्री शौचे, शांताराम शास्त्री शौचे, दिनेश शास्त्री गायधनी व अतुल शास्त्री गायधनी आदींनी पौराहित्य केले. ---चौकट नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये परंपरा देशभरात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक- त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. पण ध्वजारोहण सोहळ्याची परंपरा केवळ नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथेच होत असल्याची माहिती पुरोहित संघाचे सरचिटणीस प्रतीक शुक्ल यांनी दिली. पूजनावेळी राष्ट्रपतींनी प्रत्येक श्‍लोकाचा अर्थ समजावून सांगण्यात आला. राष्ट्रपतींनी हे अर्थ आत्मीयतेने समजून घेतले, अशी माहिती शुक्ल यांनी दिली. --- फोटो : B61181 ताम्रपटाने सन्मान पुरोहित संघातर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ताम्रपटाने सन्मानित करण्यात आले. या ताम्रपटावर ‘षष्ठि वर्ष सहस्त्राणि भागीरथ्यवगाहनम्‌; सकृत्गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पतौ!’ हा श्‍लोक कोरण्यात आला आहे. या श्‍लोकाचा अर्थ सिंह राशीत बृहस्पती (गुरु) असताना गोदावरी नदीमध्ये केवळ एकदाच केलेले स्नान हे, भागीरथी (गंगा) नदीत साठ हजार वर्षे रोज स्नान केल्याने मिळणाऱ्या पुण्याइतके फलदायी असते, असा आहे. या ताम्रपटाचे वजन दीड किलो असून नाशिकचे सतीश सातपुते यांनी हा ताम्रपट घडविला. --- राष्ट्रपतींचे आगमन सकाळी ११.२३ : राष्ट्रपतींचे आगमन सकाळी ११.२५ ते ११.४० : राष्ट्रपतींच्या हस्ते यज्ञपूजन सकाळी ११.४१ ते ११.४५ : राष्ट्रपतींच्या हस्ते गंगा गोदावरी मंदिरात पूजन सकाळी ११.४६ ते १२.०१ : मुख्य ध्वजदंड पूजन दुपारी १२ वाजून २ मिनिटे : ध्वजारोहण संपन्न -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत!" राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; भाजपकडून 'इंडिया' आघाडीच्या मॉक पार्लमेंटवर सडकून टीका

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT