physically disabled esakal
नाशिक

Nashik News : सोयीच्या जबाबासाठी पोलिसांकडून दबाव; जमिनीच्या वादात त्रस्त दिव्यांग तक्रारदाराची व्यथा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जमिनीच्या वादात पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलावले दोनदा हेलपाटे मारायला लावल्यानंतर तिसऱ्यांदा जबाब घेताना सोयीनुसार जबाब द्यावा म्हणून पोलिसांकडून दबाव आणला जात आहे.

पोलिसांच्या सोयीचा जबाब देण्यास नकार दिल्यावर पोलिसांकडून दिव्यांगाच्या मदतीला आलेल्या भावावर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची उलटी तक्रार पोलिसांकडून करण्यात आल्याची तक्रार आहे. (Pressure from police for convenient response Suffering of disabled complainant in land dispute Nashik News)

राजेश दत्तात्रय बागूल असे दिव्यांग तक्रारदाराचे नाव आहे. सकाळ कार्यालयात येऊन त्यांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील लिपीकाकडून झालेल्या अन्यायाची आपबिती सांगितले. तसेच या संदर्भात सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

बागूल यांच्या सावतानगर येथील जागेवर अतिक्रमण झाल्याने तसेच जमीन व्यवहारात वेगवेगळ्या तीन प्रकारच्या मुखत्यार पत्र देऊन फसवणूक झाल्याची त्यांनी मूळ तक्रार आहे. त्याबाबत न्यायालयात दावा सुरु आहे.

या दरम्यान त्यांच्या विरोधात जमिनीच्या मोबदल्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी जबाबासाठी बोलावले. त्यानुसार सहाय्यक आयुक्त कार्यालयात तीनदा त्यांना बोलावले, त्यानुसार बागूल यांना बराच वेळ बसवून ठेवले गेले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी संबंधित तक्रार ही जमिनीच्या वादातून असल्याचे सांगत त्यासाठी न्यायालयीन कागदपत्र सादर केले. मात्र जबाब घेणाऱ्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यास नकार देत त्याच्या मर्जीप्रमाणे जबाब देण्यास सांगितले.

त्याला बागूल यांनी नकार देत, तुमच्या सोयीचा जबाब देणार नाही, असे सांगून विरोध दर्शविला. त्यातून पोलिस आणि बागूल यांच्या सोबत भावाचा वाद झाल्याने पोलिसांकडून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार नोंदविली गेल्याचे बागूल यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात बागूल यांनीही सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. बागूल हे अपंग असून त्यांना सोबत घरातील कुणीतरी मदतनीस असल्याशिवाय कामकाज करता येत नाही, पोलिस ठाण्यात सोबतीला भावाला नेले असता पोलिसांनी मदतनीस भावावर दबाव आणण्यासाठी तक्रार केली.

पोलिसांकडूनच असे सोयीच्या जबाबासाठी दबाव येत असल्यास दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT