नाशिक

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार

CD
ॲंकर बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार ---------------------------------------- विभागातील २०६ तर राज्यातील १८ हजार विद्यार्थ्यांचे निर्णयाकडे लक्ष सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. ३ : यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीत ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये बारावीत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देऊन नियमित करावे. तसेच त्यांना बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ट होण्यास मान्यता द्यावी. सदर कार्यवाही सात दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. नाशिक विभागातील दोन हजार २०६ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या केंद्रीय प्रवेश पद्धतीचे उल्लंघन करून अकरावीत ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून लेखी खुलासा मागवावा. या संस्थांमधील विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, भौतिक सुविधा, वर्गखोल्या आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार आवश्यक बाबींची पडताळणी करून शिक्षण संचालनालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही डॉ. पालकर यांनी दिले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑफलाइन प्रवेश दिलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्येही इयत्ता अकरावीसाठी ऑफलाइन प्रवेश दिले असल्यास, अशा संस्था आणि संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर गंभीर कारवाई करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव शिक्षण संचालनालयाला सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे. चौकट प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये दंड... ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेच्या नियमित परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर परीक्षेस बसवावे. नियमबाह्य ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये दंड आकारावा. दंड कोणत्याही विद्यार्थ्याकडून वसूल करू नये; तसे आढळल्यास संबंधित संस्थेवर गंभीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. चौकट विभागनिहाय विद्यार्थी संख्या अशी *मुंबई.......६,४७८ *पुणे.........२,५९३ *नाशिक.......२,२०६ *नागपूर.......१,९४५ *छत्रपती संभाजीनगर......१,७१८ *कोल्हापूर...... १,६११ *अमरावती.......१,१३७ *लातूर......८४६ *एकूण विद्यार्थी.......१८ हजार ५३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT