Onion auction going on in market committee on Friday esakal
नाशिक

Onion News: ‘नाफेड’पेक्षाही बाजार समितीत कांद्याला जादा भाव! पैसे तत्काळ मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा

Onion News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘नाफेड’पेक्षाही उन्हाळ कांद्याला जास्तीचा दर मिळाल्याचे शुक्रवारी (ता. १) दिसून आले.

‘नाफेड’च्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने अजूनही शेतकऱ्यांचा कल बाजार समितीत कांदा विक्रीकडे आहे. (Price of onion more than NAFED in market committee Satisfaction among farmers money received immediately nashik)

‘नाफेड’ने काल (ता. ३१) ठरलेल्या दरापेक्षा १२५ रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या येताच ‘नाफेड’ने पुन्हा कांदा दर ‘जैसे थे’ करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

‘नाफेड’ने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत शहरी भागात न पाठविता त्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. फार्मर प्रोडूसर कंपन्यांनी खरेदी केलेला कांदा साठवणुकीसाठी जागा शोधण्याचे काम सुरू केले आहे.

देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठेत कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने भविष्यात कांद्याचे बाजारभाव आणखी वाढतील. यामुळे शेतकरी गरजेनुसार कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्र सरकारकडून कांद्यावर आणखी कुठलेही निर्बंध लादू नये, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. कांद्यावर लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, तसेच कांदापुरवठा करण्यासाठी किसान रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याला किमान ८०१, कमाल दोन हजार ४९४ रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी दोन हजार २०१ रुपये दर मिळाला. ‘नाफेड’पेक्षाही जास्तीचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT