Prices have come down due to increase in onion arrivals in the market Nashik Marathi News 
नाशिक

कांद्याच्या दराने घेतला यूटर्न! बंपर आवकेने कांदा गडगडला 

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कांद्याच्या दराने यूटर्न घेतला असून, मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहेत. देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर रोडावले आहेत. तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. 

दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती. हे चित्र सध्या बदलले असून, देशांतर्गत गुजरात, आंध्र प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव बाजार समितीत दरात मोठी पडझड होऊ लागली आहे. शनिवारी (ता. ६) लाल कांद्याची २५ हजार क्विंटल आवक होऊन दर किमान एक हजार ४५१, कमाल दोन हजार ५२, तर सरासरी एक हजार ८०१ रुपये एवढे राहिले. तर गावठी कांद्याच्या आवकेत घट होऊन चार हजार रुपये क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला किमान एक हजार २००, कमाल दोन हजार ४९०, सरासरी एक हजार ७५१ रुपये दर मिळाला. 

गेल्या दोन महिन्यांतील हा नीचांकी दर आहे. पंधरा दिवसांच्या तुलनेत पिंपळगाव बाजार समितीत दर घसरणीमुळे एकाच दिवशी शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांची झळ बसली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT