Blooming flower garden in the background of Vijayadashami
Blooming flower garden in the background of Vijayadashami esakal
नाशिक

Nashik Flower Market: यंदा विजयादशमीला झेंडू खाणार भाव! शेतकऱ्यांना मिळणार दोन पैसे

गोकुळ खैरनार

मालेगाव : तालुक्यासह ‘कसमादे’तील दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदा फुलपिकांना बसला आहे. पावसाच्या भरवशावर झेंडूची लागवड झाली खरी. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने लागवड अन उत्पादनही घटले आहे.

त्यामुळे यंदा विजयादशमीला झेंडू भाव खाईल. घाऊक व्यापारी आतापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, यंदा किरकोळ बाजारात झेंडूची फुले १०० ते १५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची शक्यता आहे. (prices will eat marigolds on Vijayadashami Farmers will get two paise nashik)

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका फुलशेतीत आघाडीवर आहे. निफाड, वैजापूर, येवला, दिंडोरी, वणी, कळवण या भागात फुलशेती केली जाते. ‘कसमादे’त इतर भागात अत्यल्प प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते.

यंदा प्रथमच पावसाने पाठ फिरविल्याने फुलांची लागवड पुरेशी झाली नाही. झेंडूचे रोप साडेतीन ते चार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांनी विकत घेतले एका डबीत हजार सिड्‌स (बिया) असतात. गेल्या वर्षी एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांना मिळणारी बियाण्यांची डबी यंदा अडीच ते तीन हजार रुपयांना मिळत होती.

सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली. लागवडीनंतर साधारणत: ५० ते ५५ दिवसांनी फुले काढण्यास सुरवात होते. विजयादशमीचा सण डोळ्यांसमोर ठेवून ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या सुरवातीला फुलांची लागवड करण्यात आली.

जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली.

टोमॅटोचे दर एकदम घसरल्याने शेतकऱ्यांनी पीक काढून टाकत त्या ठिकाणी झेंडूची लागवड करण्यास सुरवात केली आहे. पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड वाढली. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते.

सध्या लागवड होत असलेली फुले दिवाळीत बाजारात येऊ शकतील. जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ३५० ते ४०० एकरवर झेंडूची लागवड होते. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लागवड २०० ते २५० एकरवर आली आहे.

विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील.

"दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाली. विहिरींना जेमतेम पाणी आहे. घाऊकला ५० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला तरच फुलशेती परवडेल. दसऱ्याला बाजारात फुले मुबलक येऊ शकतील. नवरात्र व दसऱ्याच्या सुमारास पाऊस झाल्यास तो फुलशेतीला फायदेशीर ठरून उत्पन्न वाढू शकेल."

- शिवाजीराव मोरे, फुल उत्पादक, देणेवाडी (देवगाव), ता. चांदवड

"झेंडूचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. विजयादशमीच्या सणाला झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुल वापरण्याचं महत्त्व आहे. या फुलाला हिरण्यगर्भ पुष्पही म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू. देवपूजा, शस्त्रपूजा, आयुधपूजा तसेच वापरातील यंत्र, वाहन व प्रवेशद्वारावर झेंडूचा वापर प्रामुख्याने होतो."

- भिकन कुलकर्णी, पुरोहित, रावळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : '400 पार'चे स्वप्न भंगले! भाजपला मोठा धक्का, काँग्रेसची पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Raj Thackeray: राज ठाकरेंचा करिष्मा चालला; जिथे सभा, तिथे महायुतीचे उमेदवार आघाडीवर!

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे मोठ्या आघाडीवर, २६ हजार मतांचा फरक

Lok Sabha Election 2024: कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा पराभूत! मतदारांनी दिला दणका

Lok Sabha Election Result: भाजपची धाकधूक वाढली; एक्झिट पोल फेल तर राजकीय विश्लेषकांचे अंदाज गडबडले

SCROLL FOR NEXT