malegaon acc modi tweet.jpg
malegaon acc modi tweet.jpg 
नाशिक

Nashik Accident : "दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी" पंतप्रधान मोदी यांचे ट्विट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मेशी (ता. देवळा) येथे बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस ऍपे रिक्षाला घेऊन थेट विहिरीत कोसळून (ता.२८) भीषण अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले असून दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी आहे असे म्हटले आहे

पंतप्रधान मोदी यांचे ट्विट-

काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अपघात दुर्दैवी आहे. या दु:खाच्या घटनेत  दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांच्या शोकात सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्याचे बळ मिळावे देवाचरणी प्रार्थना : पंतप्रधान मोदी

असा घडला दुर्दैवी अपघात...
या भीषण अपघातामध्ये मृत प्रवाशांची संख्या 25 गेली असून अद्याप काही जण अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही घटनास्तळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

दरम्यान, या अपघात अत्यंत दुर्दैवी असून या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी व कर्मचारी या अपघातात मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.

क्लिक करा > VIDEO : यमाची काळी सावली पोहोचली पण...आजी अन् नातीची व्यथा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT