private travel fair esakal
नाशिक

Nashik News: खासगी प्रवासी वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडेआकारणी करावी : शिंदे

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : खासगी प्रवासी बस वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडेआकारणी करावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. (Private passenger vehicles should be charged according to fixed rates Shinde Nashik News)

परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. पआका/ अंमल-२ / जादा भाडे/का-२अ (१२) / २०२३ जा.क्र. १०६९० दिनांक ०६/०९/२०२३ च्या अनुषंगाने जनतेस माहितीकरिता व खासगी प्रवासी बस, वाहने, बसमालक, वाहनमालक यांना भाडे आकारणी दराबाबत आव्हान करण्यात येते,

की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यःस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ ला शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.

त्याअनुषंगाने खासगी बसमालक-वाहनमालक यांनी शासन नियमानुसार भाडे आकारणी करावी. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी, शासन नियमापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास व प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत हेल्पलाइन क्रमांक ०२५३-२२२९००५ व ई-मेल आयडी rto. 15-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी, असेही शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT