Mid Day Meal  sakal
नाशिक

Nashik: वर्षभरापासून मालेगाव ‘पोषण आहारा’चा प्रश्न सुटेना! खासगी शाळांसह सेंट्रल किचनचे ठेकेदार न्यायालयात

वर्षभरापासून विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीनेच आहार पुरविला जात आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासकीय व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब होत असताना मालेगाव शहरातील पोषण आहाराचा विषय वर्षभरापासून प्रलंबित आहे.

येथील २७ शाळांनी सेंट्रल किचनला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे वर्षभरापासून विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीनेच आहार पुरविला जात आहे. (problem of Malegaon nutrition diet not solved for year Contractor of central kitchen with private schools in court Nashik)

मालेगाव महापालिका हद्दीतील १६३ शाळांमधील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोषण आहार पुरविण्यासाठी बचत गट व इतर संस्थांकडून निविदा मागविल्या होत्या.

मात्र, या प्रक्रियेत नसलेल्या अटी नव्याने दाखवून ठराविक ठेकेदारांनाच ठेका देण्याचा डाव रचल्याचा आरोप बचत गटांनी केला. शिक्षण विभागाने यापूर्वी सेंट्रल किचन असणाऱ्या संस्थेला सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठा करण्याचा ठेका दिला आहे.

या संस्थेबरोबर इतर सात-आठ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनाही पोषण आहार पुरविण्याचे काम दिले होते. या ठेक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन प्रक्रिया राबविल्याने शहरातील ४३ बचतगटांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.

तांत्रिक लिफाफा उघडल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या पोषण आहारासाठी बचतगटांकडे अन्न शिजविण्यासाठी मशिन असणे आवश्यक असल्याचे सांगितले. निविदेत या अटीचा उल्लेख नसताना आता ही नवीन अट टाकण्यात आल्याचे बचत गटांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या बचत गटांनी यापूर्वी महापालिकेच्या शाळांना पोषण आहार पुरवठा केला. पण, नवीन अटींचा समावेश करून ठेकेदारांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत शिक्षण संस्थांनी न्यायालयात धाव घेतली.

त्या विरोधात ठेकेदारही न्यायालयात गेल्याचे समजते. नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच पोषण आहार पुरविताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

खासगी संस्थांत स्वत:चे सेंट्रल किचन

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी स्वत:चे किचन उभारले. त्यामुळे या शाळांना स्वत:चा पोषण आहार त्याच किचनमध्ये शिजवायचा आहे.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन सेंट्रल किचन पद्धतीनेच तीन वर्षांसाठी आहाराचा ठेका देते. या दोघांच्या वादामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT