Crime news esakal
नाशिक

Nashik Crime: तडीपार केलेले सराईतही शहरात मोकाट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : हद्दपारीची कारवाई केलेली असतानाही विनापरवानगी शहरात वावर ठेवणाऱ्या दोघा गुंडांना मंगळवारी (ता. १७) वेगवेगळ्या भागात पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी नाशिक रोड व भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तडीपारांचा शहरातील वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (professional criminals roaming open in city Nashik Crime)

पराग ऊर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (२७ रा. गायधनी निवास, पुरुषोत्तम शाळेजवळ, जेल रोड) व नईम अब्बास शेख (रा. घर नं. ३६५९ भोई गल्ली, बागवानपुरा भद्रकाली) असे अटक केलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे.

गोट्या गायधनी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात दोन वर्षासाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता.

मंगळवारी गायधनी कलानगर येथील थोरात पेट्रोलपंप भागात असल्याची माहिती मिळाल्याने नाशिक रोड पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबत पोलिस शिपाई मनोहर कोळी यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी कारवाई शहर गुन्हे शाखेच्या पथकाने द्वारका भागात केली. नईम शेख यास सहा महिन्यांसाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो मंगळवारी सायंकाळी हॉटेल मथुरा परिसरात मिळून आला.

याबाबत गुन्हे शाखेचे दत्तात्रेय चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक बाविस्कर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT