Bhel
Bhel esakal
नाशिक

भेळभत्त्यासोबत कांदा मिळतो मुबलक; अल्प दरामुळे व्यावसायिकांना फायदा

प्रमोद सावंत

नरकोळ (जि. नाशिक) : मिसळ पाव (Misal Pav), भेळभत्ता, शेव चिवडा, भजे तसेच दाल फ्राय (Dal Fry) असो चव (Taste) घेण्यासाठी सर्व पदार्थांची लज्जत वाढविण्यासाठी आणि वेळप्रसंगी भाकरीची संगत म्हणजे कांदाभाकर का होईना प्रत्येकाला कांदा (Onion) हवासा वाटतो. मात्र, दोन महिन्यांपासून कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे शहरी भागातील हॉटेल, ढाब्यासह ग्रामीण भागातील छोट्या- मोठ्या हॉटेलमध्ये कांदा स्वतःहून व्यावसायिक देत आहेत. (Professionals benefit from lower rates of onion Nashik News)

कांदा महाग असल्यास हॉटेल व्यावसायिक भेळभत्त्याबरोबर कांदा मिळणार नाही, असा फलक लावण्यात येतो. त्याऐवजी कोबी, मुळा, काकडीचा वापर होतो. परंतु, संध्या कांद्याचे भाव कमी असल्याने ग्राहकांची मागणी नसतानाही भेळभत्ता, मिसळपाव बरोबर कांदा आवर्जून येत असतो. मटन- भाकरीबरोबर तर कांद्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. गोंधळ, नवसाच्या कार्यक्रमात तर लिंबू- कांद्याला विशेष महत्व आहे. कांद्यास भाव कमी असल्यामुळे वाणोळा सहजगत्या मिळतो. महाग असल्यास वाणोळा पारखा होतो. कांदा पिक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करणारे असते.

कमी भाव असल्यास हे पीक न परवडणारे असते. या पिकासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. कांद्याचे दर कमी असल्याने ग्राहकांना सहज उपलब्ध करून देता येतो. महागडा असल्यास त्यावर पर्याय म्हणून कोबी, मुळा, काकडी देतो. परंतु, कांद्याशिवाय चवच न्यारी, असे ग्राहक सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT