latest marathi news esakal
नाशिक

वाहss गुरुजी! 7 वर्षांपासून भरताय विद्यार्थ्यांचा आरोग्यविमा

समाजाचे व जन्म गावाचे ऋण व्‍यक्‍त करताना जऊळके वणी येथील मविप्र शाळेतील विद्यार्थ्यांचा दरवर्षी आरोग्य विमा काढण्याचा संकल्प केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयातील (KTHM College) प्रा. अविनाश दवंगे यांनी आपले जन्मगाव जऊळके वणी येथील मविप्र संस्थेच्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांचा वार्षिक आरोग्‍य विमा हप्ता भरला आहे. हप्‍त्‍यापोटीचा धनादेश मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केला. (Latest Marathi News)

हा संकल्‍प अव्याहतपणे सुरु...

अवघे दोन वर्षांचे असताना पितृछत्र व पंधराव्या वर्षी त्‍यांचे मातृछत्र हरपले होते. समाजाचे व जन्म गावाचे ऋण व्‍यक्‍त करताना गेल्या सात वर्षापासून जऊळके वणी येथील मविप्र शाळेतील विद्यार्थ्यांचा दरवर्षी आरोग्य विमा काढण्याचा संकल्प केला. हा संकल्‍प अव्याहतपणे सुरु आहे. त्यांनी काढलेल्या मविप्र आरोग्‍य विम्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी, त्यांच्या पालकांना मदत झाली आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रा. दवंगे यांचे कौतुक श्रीमती पवार व संस्थेच्या पदाधिकारी, संचालक मंडळाने केले आहे. धनादेश सुपूर्द करतांना संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, अभियंते श्री.तापकिरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT