Nashik Commissioner of Police ankush shinde  esakal
नाशिक

Prohibition Orders : शहरात 29 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ ते २९ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत. (Prohibition orders in city till April 29 nashik news)

राज्यातील सत्ता बदलामुळे अजूनही राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून आंदोलने, निदर्शने केली जातात. तसेच, २२ एप्रिलला रमजान ईद व अक्षयतृतीया आहे.

त्याअनुषंगाने शहरात शांतता कायम राहावी, व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ ते २९ एप्रिल यादरम्यान शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या,बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणूकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशारा दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT