Breast Cancer Survivor News esakal
नाशिक

Project Durga : कुटुंबातील सदस्‍यांच्‍या सतर्कतेने यशस्‍वी उपचार

सकाळ वृत्तसेवा

एकत्र कुटुंबात राहत असताना प्रत्‍येक सण- उत्‍सव अतिशय जल्‍लोषात साजरा केला जात होता. कोरोना महामारीच्‍या काळात लॉकडाउनमध्ये सर्व घरी बसून असताना कुटुंब सदस्‍य एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवत होते. त्‍यातच छाया अहिरे यांना स्‍तनात गाठ जाणवली. आधीच कोरोना महामारीमुळे भितीचे वातावरण असताना सुरवातीला संभ्रम होता.

परंतु कुटुंबातील महिला सदस्‍यांशी चर्चा करत त्‍यांच्‍या आग्रहास्‍तव व सतर्कतेमुळे त्‍यांनी चाचण्या केल्‍या. स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान झाले, व सदस्‍यांच्‍या पाठबळामुळे कर्करोगावर यशस्‍वी मातदेखील केली. (Project Durga Successful treatment of breast cancer on chhaya Ahire nashik Latest Marathi News)

२०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे आरोग्‍य व्‍यवस्‍था विस्कळित झालेली होती. लॉकडाउनमुळे सर्व घरीच बसून होते. छाया अहिरे यादेखील आपल्‍या कुटुंबासोबत सुखासुखी जीवन जगत होत्‍या. एकेदिवशी त्‍यांना स्‍तनात गाठ असल्‍याचे आढळून आले. कुटुंबातील अन्‍य महिला सदस्‍यांशी चर्चा केल्‍यानंतर तपासणी करण्याचा आग्रह करण्यात आला. परंतु बाहेरील परिस्थिती बघता, रुग्‍णालयात जाण्याबाबत सौ. अहिरे यांना भीती वाटत होती. परंतु, सदस्‍यांनी मनोबल वाढवत तपासणीसाठी नेले.

तपासणी अहवालात कर्करोगाचे निदान झाल्‍यानंतर त्‍या प्रचंड घाबरून गेल्‍या होत्‍या. परंतु अशा परिस्थितीत त्‍यांना धीर देत, सर्वांनी मिळून कर्करोगाशी लढण्याचा निर्धार केला. केमो, रेडिएशन व शस्त्रक्रिया अशा प्रत्‍येक टप्प्यावर सौ. अहिरे यांना त्‍यांच्‍या कुटुंबियांनी प्रोत्‍साहन दिले. त्‍यांच्‍या पाठबळामुळेच या संकटातून बाहेर येऊ शकल्‍याची भावना त्‍यांनी बोलून दाखविली. कर्करोगाचे निदान हा आयुष्यातील कठीण प्रसंग होता. परंतु आता सर्वकाही सामान्‍य झालेले असून, पुन्‍हा आधीसारखे जीवन जगत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT