NMC Latest News esakal
नाशिक

Nashik News : वैद्यकीय, अग्निशमनाच्या रिक्तपदांसाठी NMCकडून प्रस्ताव

विक्रांत मते

नाशिक : वैद्यकीय व अग्निशमन दलातील रिक्तपदे भरण्यासंदर्भात राज्य शासनाची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टीसीएस व आय बीपीपीएस संस्थेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (Proposal from NMC for Medical Fireman Vacancies Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

राज्य शासनाने कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय तसेच अग्निशमन दलातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही विभागातील सेवाशर्ती नियमातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागातील 348, तर आरोग्य व वैद्यकीय विभागातील अशा एकूण 706 पदांसाठी मंजूर सेवाप्रवेश नियमावलीनुसार पदांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या दोन संस्थापैकी एका संस्थेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी निवड केली जाणार आहे. दोन्ही खासगी संस्थांमार्फत भरती करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून बुधवारी (ता. ३०) प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार प्रतिसाद मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT