नाशिक

पुरोहित संघाची प्रशासनाकडे मागणी

CD
पान-२ ----------- ३०-२ पवित्र ध्वजाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक नेमा पुरोहित संघाची प्रशासनाकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वकाळाला प्रारंभ झाला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.३१) धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांचे प्रतिकात्मक महत्त्व असलेल्या पवित्र ध्वजस्तंभाच्या संरक्षणासाठी कुंभमेळा संपेपर्यंत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी पुरोहित संघाने प्रशासनाकडे केली आहे. सुबक रचना आणि धार्मिक प्रतीकांनी सजलेला हा ध्वजस्तंभ भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरणार आहे. ध्वजारोहणानंतर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असल्याने ध्वजस्तंभाच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच या पवित्र स्थळाचे पावित्र्य जपले जावे, यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था करावी, अशी भूमिका पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वकाळात लाखो भाविक गोदावरीत स्नानासाठी दाखल होणार आहेत. २०२७ मध्ये २ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ११ सप्टेंबर या दिवशी मुख्य अमृतस्नान पर्वण्या नियोजित आहेत. याशिवाय विविध ४५ लघुपर्वण्यांमध्येही भाविकांना स्नानाचा लाभ घेता येणार आहे. या दीर्घ धार्मिक पर्वकाळात ध्वजस्तंभाचे संरक्षण, परिसरातील शिस्त आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पुरोहित संघाने व्यक्त केली आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT