intercaste marriage  esakal
नाशिक

Nashik News : आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण; प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापणार

ऑनर किलिंगसारख्या घटना रोखण्यासाठी शासन पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑनर किलिंगसारख्या घटना रोखण्यासाठी शासन पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार आहे.

आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्ष प्रत्येक जिल्ह्यात विशेष समितीच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात येणार आहे. (Protection for intercaste interfaith couples by supreme court nashik news)

तसे आदेशच गृह विभागाने जारी केले आहेत. हरियाना, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सगोत्र विवाह केल्याने ऑनर किलिंगसारख्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना सदरील आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सदस्य सचिव असतील.

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहसंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. या सुरक्षागृहांना पोलिस संरक्षण पुरविले जाणार आहे. पोलिसांच्या विशेष कक्षामार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईचा, तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे.

''हरियानातील खाप पंचायतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हरियानात गेलो होतो. ऑनर किलिंगवर उपाययोजना म्हणून तिथे सुरक्षागृह बांधण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात असे सुरक्षागृह उभारण्यात यावेत, अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाने राज्य शासनाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी उपाययोजना होत असल्याने ऑनर किलिंगच्या घटना रोखता येतील.''- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT