धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33876
महिंदळे (ता. धुळे) : आदिवासी समाज दफनभूमीच्या संरक्षक भिंत बांधकामाच्या भूमिपूजनवेळी बोलताना आमदार भदाणे. शेजारी मान्यवर.
--
महिंदळेत होणार आदिवासी दफनभूमीला संरक्षक भिंत
--
२५ लाखांचा निधी मंजूर; आमदार भदाणे यांच्या हस्ते भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : महिंदळे (ता. धुळे) येथील आदिवासी समाज दफनभूमीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार भदाणे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हास्तर योजना २०२५- २६ अंतर्गत या कामासाठी आमदार भदाणे यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिंदळे येथील आदिवासी समाज बांधवांकडून दफनभूमीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली जात होती.
वाढते अतिक्रमण आणि अस्वच्छतेमुळे येथील दफनभूमीची दुरवस्था होत होती. शासनाकडून निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. या संरक्षक भिंतीच्या निर्मितीमुळे दफनभूमीचे पावित्र्य राखले जाईल आणि अनधिकृत अतिक्रमणाला आळा बसेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास आमदार भदाणे यांनी मनोगतात व्यक्त केला.
भूमिपूजन सोहळ्यास नगरसेवक रंगा ठाकरे, खंडू बोरसे, महिला व बालकल्याण सभापती उज्वला ठाकरे, नगरसेविका अलका अहिरराव, योगेश ईशी, सामाजिक कार्यकर्ते अजय राजपूत, आकाश शिंदे, अनिल राजपूत, मयूर बनसोडे, नवनाथ पवार, विश्वनाथ पवार, निलेश पवार, हिरामण सोनवणे, संतोष पवार, रमेश पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.