फोटो -16057
मालेगाव : मोसम चौकात आंदोलन करताना शिवसेने (उबाठा)चे पदाधिकारी.
---
मालेगावात सर्वपक्षीय निषेध मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ७ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी एसआयआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये नावे कमी केली आहेत. ज्ञानेशकुमार यांच्या निषेधासाठी मालेगाव येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शिवसेने (उबाठा)चे तालुकाप्रमुख जितेंद्र देसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. मोर्चाला संगमेश्वर येथील मारुती चौकापासून सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेशकुमार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार होते. पोलिसांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे साहित्य जप्त करून परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पाेलिस प्रशासनाचा निषेध केला. या वेळी ‘वोट चोर कहा मिलेंगे, बीजेपी के दफ्तर मे’, ‘ज्ञानेशकुमारच करायच काय, खाली डोकं वर पाय’, ‘ज्ञानेशकुमार राजीनामा द्या’, ‘वोट चोर, पेपर चोर, नोट चोर कहा मिलेगे सब बीजेपी में’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जितेंद्र देसले म्हणाले, की हे सरकार हुकूमशाहीकडे कूच करत आहे. मनमर्जीने सरकारचे काम वाढले आहे. देशभरात भाजपने निवडणूक आयुक्तांना हाताशी धरून अनेकांची नावे कमी केली. त्या जोरावर हे सरकार निवडून आले आहे. ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, हरियाना या राज्यांतील निकाल बघण्यासारखे आहेत. ज्ञानेशकुमार यांनी निवडणूक आयुक्तपदाचा गैरवापर करून मतदान वाढवले आहे. ज्ञानेशकुमार हे देशाचे निवडणूक आयुक्त नसून भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करीत होते. त्यांची विशेष तपास समितीमार्फत चौकशी व्हावी. २० राज्यात १३ कोटी नागरिकांचे मतदारयादीतून नाव वगळण्यात आले. या देशातील मतदारांवर अन्याय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विधानसभाप्रमुख प्रदीप भोयर, जिल्हाध्यक्ष इम्रान इंजिनियर, शरद खैरनार, प्रा. कैलास पाटील, कैलास तिसगे, निखिल पवार, समीर सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. आंदोलनात शिवसेने (उबाठा)चे जितेंद्र देसले, काँग्रेसचे शरद खैरनार, निखिल पवार, जैनू पठाण, चेतेस आसेरी, प्रसाद गोलाईत, मयूर वांद्रे, भरत देवरे, मधू सावंत, अशोक शिंदे, विलास शिंदे, हमीद खान, शेखर पगार, संदीप पवार, अबुबकर चौधरी, गफ्फार शेख, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.