agitation esakal
नाशिक

Nashik News : सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ वारकऱ्यांची दिंडी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झाला आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी तसेच शासनाने सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदायाने शुक्रवारी (ता. १६) काळाराम मंदिर ते रामतीर्थ अशी निषेध दिंडी काढून तीव्र निषेध व्यक्त केला. रामतीर्थावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदनही देण्यात आले. (protest Movement of warkari against Sushma Andhare statement Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या वेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर दिंडी सुषमा अंधारे यांच्या निषेध करत असून यांच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही, असे वारकरी संप्रदायाकडून सांगण्यात आले होते. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील हे महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झाले.

त्यांनीही आपण राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झालो असल्याचे सांगितले. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून या दिंडीला टाळमृदंग तालावर व जय हरी विठ्ठलच्या घोषात प्रारंभ करण्यात आला. राम मंदिर दक्षिण दरवाजासमोर असणाऱ्या विठ्ठल मंदिराजवळ काही काही दिंडी थांबली या ठिकाणी विठ्ठल रखुमाई प्रभू श्री रामाला हनुमंताला सुषमा अंधारे यांना सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

निवृत्तीनाथ संस्थानचे संजयनाना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली रामतीर्थावर सुषमा अंधारे यांना सुबुद्धी व्हावी आणि त्या ज्या कोणत्या राजकीय पक्षांमध्ये आहे त्या पक्षाला वारकरी सदस्य मतदान करणार नाही, असा संकल्प केला. या वेळी मागणीचे निवेदन पंचवटी पोलिसांना देण्यात आले. पंचवटी पोलिसांनी रामकुंड परिसर आणि दिंडीच्या मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बंगाल ते आसाम... ५ राज्यांचा निकाल आज! कोण जिंकणार सत्ता? निकाल कुठे आणि किती वाजता पाहणार?

Spider Species Discovery: ‘मोग्रस पुणे’सह कोळ्यांच्या चार नव्या प्रजातींचा शोध, पिंपरी चिंचवडमधील उद्यानात जैवविविधता सर्वेक्षणावेळी संशोधन!

Breakfast Special Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा आंबट-गोड कैरी स्प्रेड; चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव

Highway Traffic jam: महामार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा ‘शो’; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, अन्यही मार्गावर संथ गती!

स्मार्ट गुंतवणूक : लिक्विड म्युच्युअल फंड

SCROLL FOR NEXT