For various demands, Aytak State Health Department Asha and group promoters organized a protest in front of the Collectorate on Wednesday. esakal
नाशिक

Asha Worker : आशा सेविका, गटप्रवर्तकांची निदर्शने; प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

आशा कर्मचारी मनापासून काम करत असताना त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Asha Worker : आशा कर्मचारी मनापासून काम करत असताना त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नाही.

त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी काम कसे करायचे, असा प्रश्न आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी उपस्थित करत बुधवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (Protests by Asha Sevika group promoters drew attention to pending demands nashik news)

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नावे दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७५ हजार आशा व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. संप काळात तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेउन काही निर्णय घेतले होते.

त्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देणार, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२००ची वाढ, संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास संपकाळातील मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार कामे पूर्ण केली परंतु त्यांचा मोबदला कपात केला आहे. यामुळे तो अदा करण्याचे व इतर आश्‍वासनांच्या पूर्ततेचे आदेश काढावेत यासाठी आंदोलन करत असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs DC Live: दिल्लीच्या १५ धावांत ४ विकेट्स! सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल, गुरजपनीतचा पहिल्याच चेंडूवर विक्रम; Video

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

SCROLL FOR NEXT