PSI physical test in November nashik news esakal
नाशिक

PSI Physical Exam Date : पीएसआयची शारीरिक चाचणी नोव्‍हेंबरमध्ये; असे असेल चाचणीचे स्‍वरूप

सकाळ वृत्तसेवा

PSI Physical Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठी अखेर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

नोव्‍हेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात ही चाचणी होणार असून, पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्‍ध करून दिली जाईल. कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झाले होते. (PSI physical test in November nashik news)

त्‍यामुळे अद्यापही अनेक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यापैकीच २०२१ च्‍या काही परीक्षांचाही समावेश आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.

त्‍यानंतरपासून उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, उमेदवारांना चाचणीला सामोरे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार ही चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार होती.

डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे ही चाचणी घेण्यात येणार होती; परंतु काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध केली असून, त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद केलेली आहे.

शारीरिक चाचणीचे असे असेल स्‍वरूप...

पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे; तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्‍या आधारे गुणांकन केले जाणार आहे. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव

Tamil Nadu Budget: मोठी घोषणा! महिलांना विवाहात आठ ग्रॅम सोने, रेशमी साडी; टीव्हीके सरकारचा पहिला अर्थसंकल्प, विविध योजनांसाठी मोठी तरतूद

Cyclonic Circulation Rain : कर्नाटकमध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती; महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; सहा जिल्ह्यांना अलर्ट

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT