Sonali Sonawane with her family esakal
नाशिक

PSI Success Story : तिळवणच्या ‘सोनाली’ची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : तिळवण (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली सोनवणे हिने जिद्द चिकाटी व बुद्धिमत्तेच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण असून तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. (PSI Success Story Sonali sonavane of Tilvan got post of police sub inspector nashik)

तिळवण येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश सोनवणे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचा पाच मुली व दोन मुले असा मोठा परिवार आहे. शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक ओढाताण करीत त्यांनी मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केले.

अशा परिस्थितीत लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या आणि आयुष्यात शिकून अधिकारी व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोनालीने दीड किलोमीटर पायी चालत गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले व दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून आपली चुणूक दाखवली.

दहावीनंतर बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावीत उत्तम गुण मिळवून कॉम्पुटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नाशिक येथे नोकरीला सुरवात करत कामासह लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी कोणताही क्लास न लावता फक्त स्वयंअध्ययन आणि खासगी अभ्यासिकेत अभ्यास सुरू केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करूनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी तीव्र बनतो.

त्याप्रमाणे आईला कोरोना झाल्यामुळे पहिल्या प्रयत्नात फक्त दोन मार्काने यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या सोनालीची जिद्द शांत बसू देत नव्हती तिने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरवात करून स्वबळावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

"आईला कोरोना झाल्यामुळे व पहिल्याच परीक्षेत दोन मार्काने अपयश आल्याने मानसिक खच्चीकरण होत होते. परंतु माझ्या आई, वडील, भाऊ, बहिणी आणि नातेवाइकांनी दिलेले प्रोत्साहन व स्वतःची मेहनत चिकाटी आणि जिद्द हेच माझ्या यशाचे खरे गमक आहे."

- सोनाली सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT