नाशिक

येवला जनता सहकारी बँक आरबीआयच्या ईसीबीए निकषांस पात्र

CD
जनता सहकारी बँक ईसीबीए निकषांस पात्र अंबादास बनकर : आरबीआयच्या दफ्तरी अधिकृत नोंद, बँकेसाठी आनंददायी क्षण सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ : येथील जनता सहकारी बँकेला लेखापरीक्षित आर्थिक स्थितीच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निश्चित केलेल्या व्यवसाय परवानगीसाठी पात्रता निकषांची (ईसीबीए) यशस्वी पूर्तता केली आहे. या पूर्ततेची अधिकृत नोंद रिझर्व्ह बँकेने आपल्या दफ्तरी घेतली आहे अशी केल्याचे माहिती बँकेचे अध्यक्ष अंबादास बनकर यांनी दिली. बँकेसाठी ही महत्त्वपूर्ण बाब असून, सभासद, ग्राहक, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या विश्वास, सहकार्य व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याचे सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नागरी सहकारी बँका- शाखा प्राधिकरण निर्देशामध्ये पूर्वीच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन (एफएसडब्ल्यूएम) निकषांच्या जागी ईसीबीए ही अधिक सुसंगत पात्रता व्यवस्था लागू केली आहे. त्यानुसार बँकेला विविध व्यवसायविषयक परवानग्या, अधिकार व मंजुरी देताना तिची आर्थिक आणि नियामक स्थिती निश्चित निकषांच्या आधारे तपासली जाते. आर्थिक घडी, पारदर्शक कारभार आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन या बाबींचे महत्त्व या प्रक्रियेत अधोरेखित झाले आहे. भविष्यातील व्यवसायवाढीसोबतच विविध आधुनिक बँकिंग सेवा, व्यवसायविस्तार आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नियामक परवानग्यांच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. ------------- कोट ईसीबीए निकषांची पूर्तता ही बँकेच्या आर्थिक कामगिरीची नोंद आहेच शिवाय सभासद, ग्राहक, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. आगामी काळातही प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी जनता सहकारी बँक कटिबद्ध आहे. - अंबादास बनकर, संस्थापक- अध्यक्ष, जनता सहकारी बँक -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT