Godavari Express (Manmad-Mumbai) esakal
नाशिक

नाशिक : गोदावरी एक्स्प्रेससाठी जनहित याचिका

अमोल खरे

मनमाड (जिल्हा नाशिक) : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस अद्यापही सुरु न केल्याने विद्यार्थी, चाकरमाने, व्यापारी, शेतकरी आणि इतर सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊनही दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी संघटनेने अखेर गोदावरी एक्सतप्रेस सुरू करण्यासाठीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांचे नियमित रेल्वे गाड्या करून सुरू केल्या आहेत. परंतु, अद्यापही अनेक गाड्यांना जनरल तिकीट मासिक पास आणि इतर सुविधा मिळत नाही. त्यामुळे आजही आरक्षण तिकीट करून प्रवास करावा लागत असल्याने जादाचे पैसे मोजावे लागत आहे. अद्यापही काही प्रवाशी गाड्या सुरू न केल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणारी आणि नाशिक (Nashik) जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस दीड वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे अखेर गोदावरी सुरू करावी, यासाठी गोदावरीचा राजा चॅरीटेबल ट्रस्ट तथा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे यांनी न्यायालयात धाव घेतली असून, उच्च न्यायालयांत अ‍ॅड. चेतन डमरे यांच्या सहकार्याने जनहित याचिका दाखल केली आहे. आता न्यायालय काय निर्णय देईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT