booklet publication by Dr. rahul ranalkar at saptashrungi devi wani
booklet publication by Dr. rahul ranalkar at saptashrungi devi wani esakal
नाशिक

SAKAL : ‘श्री सप्तशृंग निवासिनी’ पुस्तिकाचे ‘सकाळ’तर्फे आद्यपीठामध्ये प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवती देवीच्या मूर्ती संवर्धनातून पुढे आलेल्या मूळ स्वरूपासह झालेल्या विधींविषयक वृत्तमालिका ‘सकाळ’मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन शारदीय नवरात्रोत्सवातील महानवमीला भगवतीच्या आद्यपीठात झाले. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषांमध्ये हा सोहळा भारावला होता.

कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री भानोसे, नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रभारी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड आणि सोमनाथ तांबे, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सप्तशृंगगड सरपंच रमेश पवार, कळवणचे उपसभापती विजय शिरसाठ, विश्‍वस्त ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, फनिक्युलर रोप-वेचे व्यवस्थापक राजीव लुंबा, व्यापारी असोसिएशनचे अजय दुबे, माजी उपसरपंच संदीप बेनके आदींच्या हस्ते प्रकाशनाचा सोहळा झाला. (Publication of Shri Saptashrung Niwasini booklet by Sakal in Vidya Peetha saptashrungi devi gad nashik Latest Marathi News)

ग्रामपंचायत सदस्य धनेश गायकवाड, राजेश गवळी, बाळासाहेब व्हरगळ, ग्रामसेवक संजय देवरे, विजय वाघ, पिंटू तिवारी, अजय बेंडकुळे, भिकन वाबळे उपस्थित होते. प्रमोद दीक्षित, श्रीकांत दीक्षित, घनश्याम दीक्षित, गौरव देशमुख, मिलिंद दीक्षित, धनंजय दीक्षित आदी स्थानिक पुरोहितांनी मंत्रघोष केला. महानवमीनिमित्त पाहुण्यांच्या हस्ते भगवती देवीचे विविवत पूजन करण्यात आले. डॉ. रनाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत ‘सकाळ’च्या उपक्रमाविषयीची माहिती दिली.

अध्यक्षांना पुस्तिकेची भेट

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते महानवमीच्या होम-हवनाचा विधी सुरू होता. त्या वेळी आमदार पवार यांच्या हस्ते श्री. देसाई यांना पुस्तिका भेट देण्यात आली. ‘सकाळ’ने चांगला उपक्रम राबविल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. श्री. पवार यांच्या हस्ते भाविकांना पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. भगवतीच्या माहितीची पुस्तिका हातात पडताच, प्रत्येक जण पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरील देवीच्या छायाचित्राला नमस्कार करत होता. माहितीचा ठेवा मिळाल्याची भावना भाविक व्यक्त करत होते.

नवरात्रोत्सवात भाविकांची रीघ

नवरात्रोत्सवमधील प्रत्येक दिवशीच्या माळेला यापूर्वी पन्नास ते साठ हजार भाविक भगवती देवीच्या चरणी नतमस्तक व्हायचे. मूर्ती संवर्धन आणि धार्मिक महत्त्वविषयक ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेमुळे यंदा दिवसाला भाविकांच्या संख्येत १५ हजारांनी वाढ झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाला दीड लाख भाविक गडावर येतात. यंदा दोन ते सव्वादोन लाख भाविक गडावर येतील, असा विश्‍वस्त मंडळाचा अंदाज आहे.

भाविकांना मिळाली प्रश्‍नांची उत्तरे

श्री सप्तशृंगी देवीच्या स्वरूपाचे शेंदूर काढला आणि देवीचं नवं स्वरूप समोर आलं. तेव्हा मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्याचे उत्तर हे ‘सकाळ’मधील प्रसिद्ध झालेल्या संशोधनात्मक लेखनातून मिळाले. त्यावर आधारित पुस्तिका प्रकाशित झाली. पुस्तिका मला मिळाली आणि खूप आनंद झाला. माझ्यासारख्या अनेक भाविकांना अनुत्तरीत प्रश्नांना अपेक्षित उत्तर मिळाले. त्याबद्दल ‘सकाळ’चे मनापासून आम्ही आभार मानत आहोत, अशी प्रतिक्रिया भगवतीच्या भाविक कांता सोपानराव बोरसे यांनी व्यक्त केली.

"‘सकाळ’ नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिला आहे. श्री सप्तशृंग निवासिनी भगवती देवीच्या मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने शास्त्रीय माहिती ‘सकाळ’ने सर्वदूर पोचवली. त्यामुळे गडावरील भाविकांची संख्या वाढली आहे. ‘सकाळ’ने पुस्तिका प्रकाशित करत भाविकांना घरबसल्या अद्ययावत माहिती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे."

- नितीन पवार, आमदार (कळवण)

"श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवती देवीविषयक शास्त्रशुद्ध आणि धार्मिक महत्त्व ‘सकाळ’मधून प्रसिद्ध करण्यात आले. त्यातून भाविकांपर्यंत भगवतीची माहिती पोचण्यास मदत झाली. आता पुस्तिका प्रकाशित करत अधिकाधिक भाविकांपर्यंत माहिती पोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूह’चे विश्‍वस्त संस्थेतर्फे आभार मानण्यात येत आहेत."

- वर्धन पी. देसाई (जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट.

"श्री सप्तशृंग देवीच्या आध्यात्मिक व धार्मिक माहितीचे संप्रेषण ‘सकाळ’मधून प्रभावीपणे भाविकांमध्ये जनजागृती करणारे आहे. त्या माहितीवर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तिकेतून भाविकांना माहितीचा ठेवा जतन करता येईल."

-ॲड. दीपक पाटोदकर (विश्‍वस्त, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट)

"आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे सप्तशिखरावर आनंदी अनंत काळापासून वास्तव्यास असलेल्या श्री सप्तशृंगमातेच्या स्वयंभू स्वरूप आणि आध्यात्मिक सेवेबाबत पौराणिक, आध्यात्मिक व शास्त्रशुद्ध विधीचा तपशील ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला. त्यासंबंधीची पुस्तिका प्रकाशित करण्याचा स्त्युत्य उपक्रम ‘सकाळ’ने राबविला आहे. त्यातून श्री भगवतीच्या भव्य-दिव्य स्वरूपाबाबत भाविकांमध्ये प्रबोधन झाले असून, भाविकांसह विश्वस्त संस्थेतर्फे ‘सकाळ माध्यम समूह’चे आम्ही मनस्वी ऋणी आहोत."

-सुदर्शन आ. दहातोंडे (मुख्य व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट)

"‘सकाळ’ने श्री सप्तशृंग देवीसंबंधी प्रसिद्ध केलेली माहिती पुस्तिका ही भाविकांना समग्र माहिती उपलब्ध करून देणारी आहे. भाविकांना विविधांगी माहितीच्या आधारे चांगले प्रबोधन होईल, ही अपेक्षा."

-गणेश मिसाळ (प्रभारी उपविभागीय अधिकारी, कळवण)

"श्री भगवती देवीसंबंधीच्या माहितीचा स्त्रोत ‘सकाळ’ने पुस्तिकेच्या माध्यमातून भाविकांपुढे ठेवला आहे. पुस्तिकेच्या या उपक्रमाचे ‘सकाळ’चे अभिनंदन करत आहे."

- राजीव लुम्बा (व्यवस्थापक, श्री सुयोग गुरुबक्षणी फनिक्युलर रोप-वे, सप्तशृंगगड)

"श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीच्या सेवेत आमचे कुटुंब आहे. हाच भाव कायम ठेवत भगवतीची माहिती भाविकांपर्यंत ठेव्याच्या स्वरूपात पोचावी, असा प्रयत्न होता. त्याचा आनंद ‘सकाळ’ने दिला आहे. ‘सकाळ’ला मनःपूर्वक धन्यवाद!"

- संदीप बेनके (सदस्य, सप्तशृंगगड ग्रामपंचायत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT