Railway esakal
नाशिक

Nashik News: पुणे-भुसावळ रेल्वे आता नाशिकऐवजी दौंडमार्गे; पुण्याला जाणाऱ्या नाशिककरांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिककरांना पुण्याला जाण्यासाठी आणि पुणेकरांना नाशिकला येण्यासाठी सोयीची असलेली पुणे-नाशिक-भुसावळ (हुतात्मा एक्स्प्रेस) ही रेल्वेगाडी आता नाशिकमार्गे धावणार नाही, हे निश्चित झाले आहे.

ही गाडी दौड, नगरमार्गे अमरावतीला नेली जाणार आहे. रेल्वे मंडळाने तशी सूचना मध्य रेल्वेला केली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

नाशिक रोड, लासलगाव, निफाड, कल्याण, पनवेल ते पुणे लिंकवरील लोकल प्रवाशांना आणि विशेषत: नाशिक-पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्यांना पुण्याला जाणारी आरामदायी, स्वस्त गाडीच आता नसेल. (Pune Bhusawal Railway now via Daund instead of Nashik Inconvenience of Nashikkars going to Pune Nashik News)

नाशिककरांच्या प्रयत्नानंतर सुरू झालेली ही एक्स्प्रेस काही महिन्यांपासून बंद होती, तेव्हापासूनच ही गाडी हिरावली जाणार, अशी अटकळ होती. नाशिककरांना तिचे तिकीट कुटुंबासाठी अत्यंत परवडणारे होते.

रस्ता वाहतुकीपेक्षा ही गाडी जास्त सुरक्षित, आरामदायी होती. घाटातील व्यस्त मार्गाचे कारण देत ही गाडी जानेवारीपासून बंद करण्यात आली. पुणे-भुसावळ ही गाडी आता दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत नेण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. ‘पुणे-भुसावळ’ऐवजी ही गाडी ‘पुणे-अमरावती’ अशा नावाने धावणार आहे.

उरळी, दौंड कोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल, असे रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक संजय नीलम यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

...तरीही लोकप्रतिनिधी गप्पच

पुणे-भुसावळ-पुणेमार्गे नाशिक, पनवेल, कर्जत अशी ही गाडी धावत असे. या एक्स्प्रेसचा मार्ग बदलून भुसावळच्या पुढे अमरावतीपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. ही गाडी कमी अंतरावरून पुण्याला पोचेल.

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, पुणे-नाशिक-भुसावळ, राज्यराणी, दादर-मनमाड एक्स्प्रेस नाशिककरांसाठी होत्या. त्याही पळविण्यात आल्या आहेत. तरीही येथील लोकप्रतिनिधी याबाबत बोलायला तयार नाहीत, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT