फसवणूक प्रकरणात खरात न्यायालयात गैरहजर
शोषण, फसवणूक प्रकरण : ३१ ऑक्टोबरला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : देश-परदेशात लॉजिस्किटच्या व्यवसायात यश मिळावे, यासाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक भोंदू अशोक खरातच्या संपर्कात आले आणि तब्बल पाच कोटी रुपये गमावून बसले. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या नियमित खटल्यात अशोक खरात याला प्रत्यक्ष वा कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले नाही. या खटल्याची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे.
राजेंद्र अशोक जासूद (५१, रा. हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत भोंदू अशोक खरात याच्यविरोधात गुन्हा दाखल आहे. याचप्रकरणी शनिवारी (ता. १७) नाशिक कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होती. परंतु न्यायालयात याप्रकरणात कोणतेही कामकाज झाले नाही. त्यामुळे ही सुनावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणात जासूद यांना संशयित खरात याने अवतार पूजेसाठी २१ परदेशातील मातीच्या पूजनानंतर शक्ती प्राप्त होऊन त्यातून लॉजिस्टिकच्या व्यवसायात भरभराट होईल, अशी भोंदूगिरी करीत जासूद यांच्याकडून अमेरिकेत स्वत:चा वैद्यकीय उपचार, महागडी मर्सिडिज कार घेत गंडविले. तसेच ईशान्येश्वर मंदिरात पूजेवेळी नागदेवताचे दर्शन देत त्यांच्या मनात मृत्युचीही भीती घालून दिली होती. परंतु कोट्यवधी रुपये गमवूनही व्यवसायात प्रगती नसल्याने त्या बांधकाम व्यावसायिकाने कॅप्टनकडे पैशांची मागणी केली असता उलट त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा वावी पोलिस ठाण्यात (ता. सिन्नर) दाखल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.