नाशिक

विषय समित्यांसाठी अर्ज दाखल

CD
विषय समित्यांच्या निवडणुका महायुतीच्या समन्वयातून सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज दाखल; घटक पक्षांना प्रतिनिधित्व सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : महापालिकेतील विधी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य आणि शहर सुधारणा या पाच विषय समित्यांच्या निवडणुका ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महायुती धर्म पाळत सर्व घटक पक्षांना प्रतिनिधित्व देत सभापती व उपसभापती पदांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. विधी समितीसाठी जुही शिंदे व अंकिता शिंदे, शिक्षण समितीसाठी प्रा. शरद मोरे व सोनाली भंदुरे, महिला व बालकल्याणसाठी कोमल मेहरोलिया व चित्रा तांदळे, आरोग्य समितीसाठी डॉ. पूनम महाले व सतीश निकम तर शहर सुधारणा समितीसाठी जयश्री गांगुर्डे व जयंत जाचक यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान शिक्षण समितीला वैचारिक व सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने प्रा. शरद मोरे यांची निवड सार्थ असून त्यांच्या अनुभवातून मनपा शाळांचा पायाभूत विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला गती मिळेल, असे महापौरांनी सांगितले. -------------- असे झालेत अर्ज दाखल १) महिला व बालकल्याण समिती सभापती : ॲड. कोमल प्रताप मेहरोलिया (भाजप) उपसभापती : चित्रा जगन्नाथ तांदळे (भाजप) २) विधी समिती सभापती : जुई प्रणव शिंदे (भाजप) उपसभापती : अंकिता महेंद्र शिंदे (भाजप) ३) शहर सुधारणा समिती सभापती : जागृती दत्तू गांगुर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस) उपसभापती : जयंत अशोक जाचक (भाजप) ४) वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती : डॉ. पूनम योगेश महाले (शिवसेना) उपसभापती : सतीश आनंदराव निकम (भाजप) ५) शिक्षण समिती सभापती : प्रा. शरद चिंतामण मोरे (भाजप) उपसभापती : सोनाली तुषार भुंदरे (भाजप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Accident: यूएईमध्ये भीषण अपघात; मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांत भारतीयांचाही समावेश

आला रे आला! दोन वर्षांनंतर स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार; लिलावात नोंदवलं नाव, बेस प्राइज किती?

Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

SCROLL FOR NEXT