ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

Nashik ZP News: पुणे, नगरधर्तीवर बांधकामाचे काम वाटप आता ऑनलाइन : आशिमा मित्तल

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागांतर्गत काम वाटप समितीच्या काम वाटपातील वारंवार होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन, जिल्हा परिषद प्रशासनाने आता पुणे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर बांधकामाचे काम वाटप ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

पुढील महिन्यात याबाबतचे अॅप तयार करून त्याद्वारे काम वाटप करण्याची तयारी प्रशासनाची असल्याची त्यांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Construction Work Allocation Now Online ZP CEO Ashima Mittal Nashik News)

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग क्रमांक एक, दोन व तीन मधील होत असलेल्या काम वाटपाबाबत सतत ओरड असते. गतवर्षी तर, काम वाटप समितीची बैठक न घेतला थेट काम वाटप झाले होते.

त्यावेळी मोठा गोंधळ झाला होता. त्यावर, तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या काम वाटपाला स्थगिती देत, विभागीय आयुक्तांकडे तक्रार करत चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यावेळी विभागीय आयुक्त यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली होती. चौकशी समितीत काम वाटप समितीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत ठपका ठेवण्यात आला होता. असे असतानाच त्यानंतरही, काम वाटपाबाबतच्या तक्रारींचा पाढा विभागीय आयुक्तांकडे सुरूच होता.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत या तक्रारी बोलून दाखवत, बांधकाम विभागाच्या या कामकाजावर खुली नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कामे वाटप समितीच्या माध्यमातून विना निविदा वाटप करण्यात येणाऱ्या कामांबाबत नेहमीच येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त गमे यांनी कामे वाटप करण्यासाठी धोरणात्मक तोडगा काढण्याच्या सूचना श्रीमती मित्तल यांनी केल्या होत्या.

त्यावेळी त्यांनी पुणे व अहमदनगर जिल्हा परिषदेतील होत असलेल्या ऑनलाइन काम वाटपाच्या धर्तीवर यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सूचना केल्या. विभागीय आयुक्त गमे यांनी केलेल्या सूचना, काम वाटप समितीच्या काम वाटपात सुसूत्रता आणण्याकरिता प्रशासनाने ऑनलाइन काम वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

याकरिता स्वतंत्र अॅप तयार केले जाणार असून या माध्यमातून, कामांचे वाटप केले जाणार आहे. यात कोणावरही अन्याय होणार नाही तसेच तक्रारी देखील कमी होण्यास मदत मिळेल, असे श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT