पान एक मेन
------------------
पान एक मेन
-------------------------
31823
शहादा : डॉ. श्रीरंग लाड व सुमेधा चिथळे यांचा पुरुषोत्तम पुरस्काराने गौरव करताना श्याम बर्डे, राजेश पाडवी, बाबूराव बोत्रे-पाटील, नीलेश माळी, जयश्री पाटील, माधवी पाटील, जगदीश पाटील, डॉ. कांतिलाल टाटिया, प्रा. संजय जाधव, डॉ. रवींद्र चौधरी आदी.
---------------------
भारतात कापसाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत
डॉ. श्रीरंग लाड : शानदार सोहळ्यात ‘पुरुषोत्तम’ पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
शहादा : सहकारमहर्षी पी.के.अण्णा पाटील यांनी आयुष्यभर शेती, सिंचन आणि शिक्षणासाठी कार्य केले. त्यांचा परिवार त्याच्याच विचारांचा वारसा पुढे नेत शेती, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देत आहे. कापूस क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्यामुळे अण्णासाहेबांच्या नावाने मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. कापूस संशोधनामुळे आज शेतकरी एका एकरात २५ क्विंटल कापसाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. भारतात कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग देवबा लाड यांनी केले.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने विचार मंथन किसान दिनानिमित्त ‘पुरुषोत्तम पुरस्कार'' प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी मंडळाचे व फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील होते. आमदार राजेश पाडवी हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
माळसोन्ना (जि. परभणी) येथील कापूस तज्ज्ञ डॉ. श्रीरंग लाड (दादा लाड) यांना वैयक्तिक स्तरावर तर सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत पुणे येथील ''सोल्जर इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन''च्या संचालिका सुमेधा चिथळे यांना ‘पुरुषोत्तम पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येकी १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी पानसेमलचे आमदार श्याम बर्डे, आमदार राजेश पाडवी, ओंकार साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव जयश्री पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. कांतिलाल टाटिया, सातपुडा शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव, नंदुरबार येथील उद्योजक डॉ. रवींद्र चौधरी, मंडळाचे संचालक रमाकांत पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते नुह नुराणी, सुनील पाटील, उद्धव पाटील आणि खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाडवी म्हणाले, की सातपुड्याच्या भूमीला विकासाचे स्वरूप स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी दिले. आपल्या कार्यामुळे ते पिढ्यान्पिढ्या जनमानसात जिवंत राहतील.
आमदार श्याम बर्डे म्हणाले, की प्रतिकूल परिस्थितीतही पी.के. पाटील यांनी या परिसराचा विकास केला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. सुमेधा चितळे म्हणाल्या की, विचार ऐकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. अर्पण आणि समर्पणाशिवाय सेवा अपूर्ण आहे. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पी.के. अण्णा पाटील यांनी दानातून सहकार उभा केला. साखर कारखाना, सूतगिरणी आणि शैक्षणिक संकुल ही त्याची उदाहरणे आहेत. असे दीपक पाटील यांनी सांगितले.
प्रा. मकरंद पाटील यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. विजय शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, पी.के.अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.