जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीस गती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : यंदा दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट होती. त्यात रब्बीबाबत शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यात गहू पेरणी या आठवड्यात सुरू झाली आहे. हुडहुडी भरविणारी थंडी अजून खानदेशात नसल्याने थंडीची प्रतीक्षा आहे. खानदेशात काही मोठ्या प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. पण चारा कमी आहे. कमी पावसामुळे मका, बाजरी व इतर पिके खराब झाली होती. मागील वेळेस ओल्या दुष्काळामुळे शिवारात पिके खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागला होता. पण आता रब्बीबाबत शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. चारा पिकांची पेरणी सुरू असून, चाऱ्याची अडचण यातून दूर होवू शकणार आहे. खानदेशात २०२३ मध्ये कमी पाऊस होता. वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के इतका पाऊस झाला होता. मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सरासरी कमी जलसाठा उन्हाळ्यात होता. पाण्यासाठी अनेक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सतत बैठका व नियोजन करावे लागले.
चौकट
गहू पेरणी सुरू, थंडीची प्रतीक्षा
हरभरा पेरणी पूर्ण खानदेशात कोरडवाहू व बागायती क्षेत्रातील हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. काही शेतकरी सध्या केळीची काढणी पूर्ण झालेल्या क्षेत्रात मोठ्या काबुली हरभऱ्याची पेरणी करीत आहेत. मोठा काबुली हरभरा पेरणी चोपडा, यावल, रावेर भागात सुरू आहे. केळीमध्ये मिनी ट्रॅक्टरने मशागत करून लागलीच पेरणी केली जात आहे. खानदेशात यंदा हरभरा पेरणी अधिक आहे. एकूण पेरणी पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत होईल, असाही अंदाज आहे. यापाठोपाठ मका, गहू व ज्वारीची पेरणी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.