Radhakrishna Vikhe Patil Latest News
Radhakrishna Vikhe Patil Latest News esakal
नाशिक

हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कुटुंब पत्रिका : Radhakrishna Vikhe Patil

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हरियानात परिवार प्रपंच पत्रिका नावाने कुटुंब पत्रिका आहे. मागील आठवड्यात राज्यातील मंत्री आणि सचिवांनी हरियानाचा दौरा करून तेथील परिवार कार्डाची माहिती घेतली. वैयक्तीक आधार कार्डाप्रमाणे आता सगळ्या कुटुंबातील व्यक्तीचा डेटा एकाच स्मार्ट कार्डात संकलित करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे.

अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. नाशिक दौऱ्यावर असलेले श्री विखे यांनी शुक्रवारी (ता.१४) दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत आमदार डॉ.राहुल आहेर हेही उपस्थित होते. (Radhakrishna Vikhe Patil announcement of family journal in Maharashtra like haryana Nashik Latest Marathi News)

विखे- पाटील म्हणाले की, राज्यात महसूल विभागाशी संबंधित अनेक विषय प्रलंबित आहे. जमिनीची मोजणी करायची तरी आठ- आठ महिने मोजणी होत नाही. तुकडे बंदी असली तरी गुंठेवारीच्या माध्यमातून टोळ्या तयार झाल्या आहेत. तुकडे बंदी शिथिल करण्याचा विचार सुरु आहे.

मात्र दहा आणि पाच गुंठे जमिनीच्या तुकड्यांना परवानगी दिली तर त्यातून अनेक समस्या पुढे येण्याचा धोका आहे. माफियागिरी वाढण्याचा धोका आहे. लोक सोयीनुसार प्लॉटचे तुकडे करून ते विकून मोकळे होतील. मग प्लॉट घेतलेल्यांना रस्ते, वहिवाटी मिळण्याचे काय असे अनेक विषय त्यातून निर्माण होणार आहे.

अनेक वर्षाचे संचित

राज्यात सध्या जमीन महसूली फसवणुकीचे प्रकार कमी नाहीत. त्यात दप्तर दिरंगाई हेही महत्त्वाचे कारण आहे. हा विषय आजचा नाही. अनेक वर्षापासून वाढत वाढत हा विषय उग्र बनला आहे. त्यामुळे आता एका महिन्यात जमिनीची मोजणी होऊन मोजणी मागणाऱ्याच्या हातात मोजणीचा कागद देण्याचा नियम केला जाईल.

तसेच राज्यातील सगळे सबरजिस्टर कार्यालये डिजिटल करणार असून परस्परांना जोडून पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच आधार कार्डाप्रमाणे सगळ्या कुटुंबाचा डेटा एकाच कार्डात देणाऱ्या कुटुंब पत्रिका आणल्या जाणार आहे. जमिनीच्या मोजणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येक जिल्ह्याला एक जमीन मोजणीचा रोव्हर दिला जाईल.

काय केले जाणार

- डीपीडीसीतून प्रत्येक जिल्ह्याला मोजणीसाठी रोव्हर
- राज्यात एन ए बांधकाम परवानग्या ऑनलाइन
- तहसिल कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही
- महिनाभरात जमिनीची मोजणी करून कागद देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT