MS Bhamre and others along with Shahaji Umap while demolishing Gavathi Hatbhatti liquor store at Lohoner.
MS Bhamre and others along with Shahaji Umap while demolishing Gavathi Hatbhatti liquor store at Lohoner. esakal
नाशिक

Nashik Crime: लोहोणेरला गावठी दारू अड्ड्यावर छापा; पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : लोहोणेर (ता.देवळा) येथे गुरुवारी (ता.२५) सकाळी नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पथकाने अवैध गावठी दारू भट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य नष्ट केले.

यावेळी पथकाने ८७ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वतः पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा मारल्याने सर्रास उघड्यावर दारू विकणारे आणि बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईत देवळा पोलिस ठाण्यात दोन आरोपींवर राज्य दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Raid at Lohoner Gavthi Liquor Store action of team with Superintendent of Police Shahaji Umap Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुरुवारी (ता.२५) सकाळी सहाला लोहोणेर (ता.देवळा) येथे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकासह अवैध गावठी दारू बनविण्यात येत असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला.

याप्रसंगी संशयित रामू माळी (रा. लोहोणेर) आणि गिरणा नदी किनारी असलेल्या सिद्धिविनायक किराणा दुकानात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा एक हजार ४८५ किलो वजनाचा काळा गूळ विनापरवाना मिळून आल्याने दुकान मालक प्रदीप बच्छाव या दोघांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एस.भामरे, श्री. मोरे, महिला पोलिस नाईक श्रीमती.जाधव, रामप्यारी गणोरे, श्री.वाघमारे, श्री. झाल्टे, श्री. भुसाळ, श्री.वायकंडे, श्री. चारोस्कर यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT