Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : दरेगाव शिवारात सय्यद पार्कला छापा; 88 हजाराचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारातील सय्यद पार्क येथे सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या पथकाने छापा टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी साठा करून ठेवलेला ८८ हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघी संशयित फरार आहेत. (Raid at Syed Park in Daregaon Shiwar Gutkha worth 88 thousand seized Nashik Crime News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

पोलिस अधीक्षक शहाजी उमप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक संधू, त्यांचे पथकातील पोलिस नाईक इम्रान सय्यद, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे आदींसह पवारवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरेगाव शिवारातील सय्यद पार्क येथे जावीद तांबोळी, अब्बास तांबोळी यांनी गफार तांबोळी तसेच, हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....सय्यद अल्ताफ यांच्या राहत्या घरात अवैध रित्या गुटखा, पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती संधू यांना मिळाल्यावरून हा छापा टाकण्यात आला.

यात ८८ हजाराचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. गफार शब्बीर अहमद तांबोळी, सय्यद अल्ताब सय्यद अहमद (दोघे रा. सय्यद पार्क) यांना अटक करण्यात आली. जावीद तांबोळी व अब्बास तांबोळी दोघे संशयित फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT