Abu Azmi
Abu Azmi  esakal
नाशिक

Nashik News : अबू आझमींशी संबंधितांवर छापे नाशिकमधील, भंगार मार्केटही रडारवर

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू आझमी यांच्याशी संबंधित व्यक्तींवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. देशभरात ३० ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील दोन ठिकाणांचा समावेश असून, नाशिकमधील अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केट मधिल त्यांचे नातेवाईक समावेश यात आहे. दरम्यान, या कारवाईत भंगार व्यावसायिकांच्या मागे चौकशीचा सिसेमिरा लागला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्राप्तिकर विभागाने मंगळवारपासून मुंबई, नाशिकसह कानपूर, वाराणसी, लखनौ व कोलकता येथे एकाच वेळी छापे टाकले. हे छापे अबू आझमी व समाजवादी पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर टाकण्यात आले. त्यामध्ये मुंबईतील कुलाबा परिसरातील दोन कार्यालयांचा व अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केट चाही समावेश होता. (Raids on Abu Azmi associates in Nashik scrap market also on radar Nashik News)

हे मुख्य प्रकरण उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशात विनायक निर्माण लिमिटेड ही कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आभा गुप्ता यांनी अबू आझमी यांच्यासह या कंपनीत बेहिशेबी पैसा गुंतवला. हा सर्व पैसा हवालाचा होता. मिळकत लपवून हा पैसा विविध व्यवसायात गुंतविण्यात आला, असा प्राप्तिकर खात्याला संशय आहे.

त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. विनायक निर्माण लिमिटेडच्या लखनौतील कार्यालयावरदेखील छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी अबू आझमी व त्यांचे जवळचे नातेवाईक तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. आझमगडचा व अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केट यांचा आर्थिक व गुन्हेगारीचा संबंध राहिला आहे. पूर्वी अबू स्टील नावानेच भंगार व्यवसाय या परिसरात होता. भंगार मार्केटमधिल अनेक आर्थिक वादातून घटलेल्या गुन्हात संबंधित गुन्हेगार उत्तर प्रदेशमधील आझमगड व इतर परिसरात पळून जातात .काही गुन्हेगारांना तपास यंत्रणेने आझमगडवरून अटक केल्याचेही उघड झाले आहे.

नेत्याचा राबता

सातपूर- अंबड लिंक रोडवरील खास करून आझमगडचे आझम खान, अबू आझमी, नवाब मलिक, कृपाशंकर सिंग, जगजबिका पाल, विकास दुबे आदी उत्तर भारतीय नेत्यांच्या नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणावर भंगारचा व्यवसाय असल्याने या ठिकाणी या नेत्याचा नेहमीच राबता राहिल्याची नोंद पोलिस खात्यात आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT