नाशिक

राजापूर आरोग्य केंद्राचा भार एकाच आरोग्य सेविकेवर! रिक्त पदावर आरोग्य सेविकेच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा

CD
पान तीन ---------------- राजापूर आरोग्य केंद्राचा भार एकाच आरोग्य सेविकेवर रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १८ : तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवांचा ताण वाढला असून, संपूर्ण केंद्राचा भार सध्या एकाच आरोग्य सेविकेवर पडत आहे. चार आरोग्य उपकेंद्रांचा समावेश असलेल्या या केंद्रात एकाच आरोग्य सेविकेला दिवस-रात्र सेवा द्यावी लागत असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या आरोग्य सेविकेच्या पदावर तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र आहे. या केंद्रांतर्गत चार आरोग्य उपकेंद्रे कार्यरत असून, प्रसूती सेवा, आरोग्य शिबिरे, लसीकरण तसेच नियमित आरोग्य तपासणीची जबाबदारी या केंद्रावर आहे. मात्र, आरोग्य सेविकेचे एक पद रिक्त असल्याने उपलब्ध असलेल्या एकमेव आरोग्य सेविकेवर संपूर्ण केंद्राचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी, त्यांना २४ तास सेवा देण्याची वेळ येत असून, कामाचा ताणही वाढत आहे. विशेषतः महिला, बालके, गरोदर माता आणि ज्येष्ठ नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण व आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर वेळेत आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असताना, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या सेवांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात तातडीने आणखी एका आरोग्य सेविकेची नियुक्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच सुभाष वाघ, प्रमोद बोडके, दत्ता सानप, अण्णासाहेब मुंडे, राजेंद्र आव्हाड, प्रकाश वाघ, लक्ष्मण घुगे, सचिन जाधव, शंकरराव अलगट, पी. के. आव्हाड, समाधान चव्हाण,अशोक आव्हाड, अनिल अलगट, समाधान आव्हाड, भाऊसाहेब बैरागी आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

SCROLL FOR NEXT