rajdhani express esakal
नाशिक

राजधानी एक्स्प्रेस आता चार दिवस; मध्य रेल्वेचा निर्णय!

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : लॉकडाउनचे निर्बंध आणि कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे गाडीला प्रतिसाद कमी लाभल्याने तोटा वाढला होता. परंतु लॉकडाऊन निर्बंध शिथील होताच दिल्लीला धावणाऱ्या मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसबाबत (rajdhani express) शुक्रवा मध्य रेल्वेने (central railway) निर्णय घेतला आहे. ज्यामुळे दिल्लीशी कनेक्टिव्हिटीला नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीचे होणार आहे. (Rajdhani-express-frequency-increse-nashik-marathi-news)

नाशिकच्या प्रवाशांना दिल्ली कनेक्टिव्हिटी सोयीची

दिल्लीला धावणाऱ्या मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसची वारंवारिता (फ्रिक्वेंसी) वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आठवड्यातून दोनऐवजी चार दिवस ही गाडी दिल्लीला धावणार आहे. राजधानी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणेच रोज धावेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. शुक्रवारपासून मुंबईहून नाशिक रोडमार्गे गाडी मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. दिल्लीहून ही गाडी बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल. ही गाडी पूर्ण आरक्षित असून, गाडीसाठी बुकिंग विशेष शुल्कासह आरक्षण केंद्र आणि वेबसाइटवर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे. लॉकडाउनचे निर्बंध आणि कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे गाडीला प्रतिसाद कमी लाभल्याने तोटा वाढला होता. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेसची वारंवारिता कमी केली होती. ती आता वाढविली आहे.

विमानसेवेबरोबरच रेल्वेची सेवाही नाशिककरांना उपलब्ध

कन्फर्म तिकीट असणाऱ्यानांच या गाडीतून प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवेबरोबरच रेल्वेची सेवाही नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. प्रवाशांना दिल्ली जाण्यासाठी एक पर्याय रेल्वेने उपलब्ध करून दिला असून, प्रवाशांनी कोरोनाचे सर्व नियम पालन करून या गाडीने प्रवास करावा, असे आदेश रेल्वे प्रशासनाने पारित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT