rajesh junnarkar and rangoli drawn by him esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : राजेश जुन्नरकरांच्या रांगोळीची कीर्ती पंढरपूरपर्यंत...!

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आता नगर जिल्ह्यातील लोणी येथून राजुरीकडे प्रस्थान ठेवत आहे. पालखी सोहळा म्हटला की वेगवेगळी काम करणा-या स्वयंसेवकांपासून फुलांची रथ सजावट असो किंवा रथापुढे प्रत्येक गावात रांगोळी काढणारी हात असोत. (Rajesh Junnarkar and his colleagues are working to draw rangoli in front of sant Nivruttinath palakhi nashik news)

हा प्रत्येक एकूण एक घटक निवृत्तिनाथांच्या पालखीसाठी राबवत असतो. या सर्व राबणाऱ्या हातांची कृतज्ञ दखल ‘पालखीसाठी राबणारे हात’ या सदरातून आजपासून प्रसिद्ध करत आहोत.

मागील पाच वर्षांपासून हभप राजेश जुन्नरकर आणि त्यांचे हे सहकारी निवृत्तिनाथांच्या रथासमोर रांगोळी काढण्याचे काम करत आहेत. स्वर्गीय हरिभाऊ गिते शिंगवे प्रतिष्ठानच्या सौजन्याने त्र्यंबकेश्वरपासून ते थेट पंढरपूरपर्यंत जुन्नरकर आणि त्यांचे सहकारी ज्या ठिकाणी निवृत्तिनाथांच्या पालखीचा मुक्काम आहे, त्या- त्या ठिकाणी भल्या पहाटे उठून रथाच्या सभोवताली सडासंमार्जन करून सुंदर अशी रांगोळी काढतात.

प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पालखी सोहळ्याची स्वागत होते, त्या- त्या ठिकाणी पालखीसमोर रांगोळी काढली जाते तसेच गावातील मुख्य रस्त्यांवरदेखील रांगोळी काढली जाते. वारी मार्गावर ज्या- ज्या ठिकाणी वारकऱ्यांचा रिंगण सोहळा असतो, त्या -त्या ठिकाणी देखील संपूर्ण गोलाकार रिंगणाला रांगोळीने छान सजवण्याची काम जुन्नरकर करतात.

श्री. जुन्नरकर यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च रांगोळी काढण्यासाठी येत असतो. मात्र यासाठी कोणताही मोबदला ते घेत नाहीत. जुन्नरकर हे मूळचे आळंदीचे. वारी सोहळ्यादरम्यान जुन्नरकर यांच्या वडिलांची निधन झाले. मात्र त्यांनी आपल्या रांगोळी काढण्याच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडू न देता वडिलांचा अंत्यविधी आटोपून अगदी दुसऱ्याच दिवशी ते वारी सोहळ्यात हजर झाले.

दरम्यान, पालखीसोबत वेगवेगळ्या घडामोडींची माहिती देणारे संत निवृत्तीनाथ संस्थांनचे प्रसिद्धीप्रमुख तथा विश्वस्त प्रा. अमर ठोंबरे म्हणाले की, निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे लोक सहभागी होतात. संतांवरच्या अपार भावभक्तीतून हे घटक व्रतस्थ रीतीने काम करत आहेत. पालखी सोहळ्यासाठी राबणारे प्रामाणिक लोक यांची मात्र प्रसिद्धी होत नाही त्यांची कृतज्ञ दखल या निमित्ताने घेतली जावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT